74 वर्षांच्या वृद्धेला श्वास घ्यायला त्रास, दीड तासांनंतरही अँब्युलन्स येईना, अखेर..

| Updated on: Apr 22, 2024 | 8:24 AM

घाटकोपरमध्ये राहणाऱ्या एका 74 वर्षांच्या वृद्ध महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनीफोन करून अँब्युलन्स बोलावली मात्र दीड तासांनंतरही रुग्णवाहिका न आल्याने अखेर शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेऊन त्या वृद्धेला स्वखर्चाने राजावाडी रुग्णालयात दाखल केले

74 वर्षांच्या वृद्धेला श्वास घ्यायला त्रास, दीड तासांनंतरही अँब्युलन्स येईना, अखेर..
Follow us on

घाटकोपरमध्ये राहणाऱ्या एका 74 वर्षांच्या वृद्ध महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनीफोन करून अँब्युलन्स बोलावली मात्र दीड तासांनंतरही रुग्णवाहिका न आल्याने अखेर शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा त्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेऊन त्या वृद्धेला स्वखर्चाने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्या वृद्धेचे प्राण वाचले.

रुग्णांना ताताडीने उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी फोन केल्यास 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मिळण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. मात्र या सेवेचा फारसा काही उपयोग नसल्याचे नुकत्याच घडलेल्या प्रकारावरून समोर आले आहे.

घाटकोपरमधील पूर्वेकडील पटेल चौक परिसरात राहणाऱ्या शोभा रनकोटला यांना याचा नुकताच अनुभव आला. शोभा यांना मधुमेह आहे, त्यातच त्यांना गँगरीन झाल्यामुळे एक पाय काढण्यात आला होता. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्या जावयाने फोन करून 108 नंबरची रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आम्ही रुग्णवाहिका पाठवली आहे सांगत कर्मचाऱ्यांनी तब्बल एक-दीड तास टोलवाटोलवी केली. इकडे शोभा यांची प्रकृती बिघडत होती, तरी अँब्युलन्स काही आलीच नाही.

शेवटी त्यांचा मुलगा आणि जावयाने शिवसेनेच्या (उ बा ठा) शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच प्रकाश वाणी, संघटक सचिन भांगे यांनी तातडीने त्यांचे घर गाठले आणि शोभा यांना स्वखर्चाने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाटले.

मात्र, 108 सेवा देणारे कर्मचारी खोटी माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. याची गंभीर दखल सरकारने घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्वयक प्रकाश वाणी यांनी केली आहे.