Khavadya Dongar case: खवड्या डोंगर प्रकरणात नवा खुलासा! तिसऱ्या व्यक्तीची एण्ट्री, आईच्या व्हिडीओने खळबळ

Khawadya Dongar case: छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगर परिसरातील एक घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. चांदगुडे कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

Khavadya Dongar case: खवड्या डोंगर प्रकरणात नवा खुलासा! तिसऱ्या व्यक्तीची एण्ट्री, आईच्या व्हिडीओने खळबळ
Khavadya Dongar
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 23, 2026 | 8:37 AM

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव नजीकच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये १९ वर्षीय कुणाल चांदगुडे, त्यांचे वडील मुरलीधर चांदगुडे (४८) आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे. या घटनाक्रमानंतर सध्या प्रकरणाला कौटुंबिक वादाचा नवा पैलू समोर येत आहे. संगीता यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे मोठी खळबळ माजली आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

सुरुवातीला या वादामागे आयफोन खरेदी किंवा त्याच्या ईएमआयचा मुद्दा असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र डीसीपी नवले यांनी स्पष्ट केले की, प्राथमिक तपासात आयफोन आणि मृत्यूंमध्ये कोणताही थेट संबंध किंवा पुरावा आढळलेला नाही. ही केवळ अफवा आहे. आता संगीता चांदगुडे यांचे सोशल मीडिया अकाउंट समोर आल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. त्यांनी या अकाउंटवर काही व्हिडिओ शेअर केले होते. या व्हिडिओंमध्ये त्यांनी पती मुरलीधर यांच्यासोबतच्या कौटुंबिक तणावाबद्दल आणि घरातील परिस्थितीबद्दल उघडपणे बोलले आहे.

तिसरी व्यक्ती कोण?

संगीता यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्या संसारात एका नातेवाईक महिलेच्या सततच्या हस्तक्षेपामुळे वाद निर्माण होत होते. सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला आणि त्यानंतर घरातील मतभेद अधिक तीव्र झाले. काही नातेवाईकांकडून आपल्याला आणि पतीला त्रास दिल्याचाही दावा त्यांनी या व्हिडिओंमध्ये केला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर मुरलीधर यांनाही मानसिक धक्का बसला असल्याचे संगीता यांनी सांगितले आहे.

पोलिसांचा तपास सुरु

या सोशल मीडिया व्हिडिओमधील आरोप आणि खवड्या डोंगरावरील घटनेचा नेमका संबंध काय, हे पोलिसांच्या तपासातूनच स्पष्ट होईल. संगीता यांनी उल्लेख केलेली तिसरी व्यक्ती कोण आहे? याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. मात्र सोशल मीडियावरील आरोपांना अधिकृत निष्कर्ष मानू नये. पोलीस तपासातूनच खरे सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us