…तेव्हा आम्हाला वाटले अरे आभाळच फाटले, राज ठाकरे यांच्यासमोर MPSC च्या त्या तरुणाचे बाणेदार भाषण

पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. काल या आंदोलनाला शिवसेना नेते संजय राऊत आणि अन्य नेत्यांनी भेट दिली होती.

...तेव्हा आम्हाला वाटले अरे आभाळच फाटले, राज ठाकरे यांच्यासमोर MPSC च्या त्या तरुणाचे बाणेदार भाषण
raj thackeray AT pune
| Updated on: Oct 05, 2026 | 8:33 PM

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सुरु असलेल्या एमपीएसीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन स्थळाला भेट दिली. राज ठाकरे येणार म्हणून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह शिगेला पोहचला होता. राज ठाकरे येथे येऊन काय आश्वासन देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना. या ठिकाणी एमपीएससीच्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगणाऱ्या विवेकानंद पाटील यांच्या बाणेदार भाषणाने राज ठाकरेही आश्चर्यचकीत झाले. राज ठाकरे यांच्या समोरच विवेकानंद पाटील यांनी एपीएससीच्या अध्यक्षांना अखेरचा संदेश दिला. त्यामुळे एकच हशा उसळला.विवेकानंद पाटील यांनी राज ठाकरे यांच्या समोर नेमके काय केले भाषण वाचा…

राज ठाकरे यांनी पुणे येथे एमपीएससीच्या तरुणांनी केलेल्या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. त्यावेळी एमपीएससीच्या परिक्षा पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी विवेकानंद पाटील यांनी सांगितली. त्यावर राज ठाकरे म्हणाले मला माहिती आहे. त्यावर हे ठाकरे आहेत यांना सर्व माहिती असते असे विवेकानंद पाटील यांनी वक्तव्य करताच विद्यार्थ्यांकडून त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला.

Loading...

विवेकानंद पाटील यावेळी भाषण करताना म्हणाले की आज साहेबांना ऐकायचं आहे. त्यांना या आंदोलनाची पार्श्वभूमी मी सांगणार आहे. एमपीएससीच्या अध्यक्षांना निर्वाणीचा इशारा देताना पाटील यांनी, ‘आम्हीही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही. आम्ही संयम पाळतोय म्हणजे गांडूंची अवलाद नाही,’ असे ठाकरी शैलीत सुनावले. आम्हाला राज्य सेवा परीक्षेत ५०० मार्कांचा ऑप्शनचा मराठी लिटरेचरचा विषय होता. तो यांनी काढून टाकण्याचा निर्णय घेतला. मग आम्ही मराठी मुले राज्य सेवेत कसे पुढे येणार ? असा सवाल यावेळी विवेकानंद पाटील यांनी केला.

अरे आभाळच फुटले

यावेळी कवि कुसुमाग्रज यांच्या ओळी वाचत विवेकानंद पाटील म्हणाले की..मोडा मान माझी, मी वाकणार नाही..धोका जरी मला वाटे… आता मागे फिरावयाचा आमचा विचार नाही. साहेब ग्रुपी बी, सी, राज्य सेवेचे, सगळेच एमपीएससीचे पेपर फुटले, नंतर आमदार फुटले, पक्ष फुटले, तेव्हा आम्हाला काय वाटले नाही. पण आमचा पेपर फुटला तेव्हा आम्हाला वाटले की अरे आभाळच फुटले अशी व्यथा विवेकानंद पाटील यांनी बोलून दाखवली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us