
भाईंदर : भाईंदरच्या(Bhayandar) खाडी पुलावर एक थराराक घटना घडली आहे. या पुलावरुन एका तरुणीने आत्महत्येचा(suicide ) प्रयत्न केला आहे. ही तरुणी भाईंदरच्या पुलावर एकदम कडेला उभी होती. यावेळी या पुलाजवळून जाणाऱ्या विरार लोकलच्या मोटरमनने तिला पाहिले आणि फोन करुन पोलिसांना सांगीतले. मात्र, पोलिस घटना स्थळी पोहचण्याआधीच तरुणीने पुलावरुन उडी मारली. मात्र, या तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न फसला असून ती सुखरुप बचावली आहे. या तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याचा पोलिस तपास करत आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न करणारी ही तरुणी नालासोपारा येथील रहिवासी आहे. ती 16 वर्षीची आहे .या तरुणीने 22 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास भाईंदर रेल्वे स्थानक ते नायगाव रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रेल्वे पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु तेथील स्थानिक मासेमारी करणा-या मच्छीमारांनी तरुणानी तिला खाडीत बुडाण्यापूर्वीच वाचवले.
स्थानिकानी काढलेल्या विडीओ मध्ये ती मुलगी किना-यावर बराच वेळ उभी होती. नंतर पुलाच्या काठावर ही मुलगी उभी राहिली. मच्छीमारांनीही आपल्या मोबाईलमध्ये त्या मुलीचे सर्व दृश्य टिपले होते. मच्छिमारांनी या प्रकरणाची माहिती रेल्वे पोलिसांना देण्याआधीच तीने पुलाच्या काठड्यावरुन खाडीत उडी मारली. त्यानंतर स्थानिक मच्छिमारांनी तिला वाचवलं. रेल्वे पूलावरून जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या चालकानेही रेल्वे पोलिसांना फोन करून तरुणी पुलाच्या बाजूला उभी असल्याची माहिती दिली होती.
मुलील वाचवल्यानंतर तिला लागलीच टेंबा हॉस्पिटल येथे नेऊन तिच्यावर औषध उपचार करण्यात आले. शेवटी मुलीला सुरक्षित तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon News) तालुका शेतकऱ्याच्या आत्महत्येनं हादरलाय. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं आत्महत्या (Maharashtra Farmer Suicide News) केली. मालेगावातील नांदगावच्या बाणगाव बुद्रूक इथं ही घटना घडली. राहत्या घरातच शेतकऱ्यानं गळफास लावून घेतला आणि जीव दिला. या शेतकऱ्यांवर दोन लाख रुपयांचं कर्ज होतं, अशी माहितीसमोर आली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन लाख रुपयांचं कर्ज कसं फेडायचं, या विवंचनेत शेतकरी होता. त्यातून त्याने अखेर प्रचंड तणावाखाली येऊन आपली जीवनयात्रा संपवली असल्याचं सांगितलं जातंय. जनार्दन कवडे असं या शेतकऱ्याचं (Maharashtra Farmers) नाव आहे. जनार्दन यांच्या आत्महत्येमुळे कवडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर आणखी एका शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांतली शेतकरी आत्महत्यांची आकडेवारीही चिंताजनक आहे.