महाराष्ट्राच्या राजकारणाचं अनोखं रूप, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शिवसेनेचे आदित्य ठाकरे सहभागी

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं अनोखं रुप बघायला मिळालं.

महाराष्ट्राच्या राजकारणाचं अनोखं रूप, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत शिवसेनेचे आदित्य ठाकरे सहभागी
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 5:39 PM

हिंगोली : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. कारण काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून जातेय. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली असून काश्मीरपर्यंत जाणार आहे. ही पदयात्रा आहे. या यात्रेत राहुल गांधी सर्वसामान्यांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील मिळताना दिसतंय. कारण राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या या भारत जोडो यात्रेत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेला शिवसेना पक्षही सहभागी झालाय.

भारत जोडो यात्रा सध्या नांदेडमधून हिंगोलीत पोहोचली आहे. या यात्रेत आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले. राहुल गांधींच्या या यात्रेत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते सहभागी झाले होते. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील या यात्रेत सहभागी झाले.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातला पाचवा दिवस आहे. या यात्रेला महाराष्ट्रातही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणखी काही नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस आणि शिवसेनेत संबंध ताणले गेलेय?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसच्या मंत्र्यांच्या नाराजीच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. सत्तेत असूनही आपल्याला महत्त्वाच्या निर्णयांबाबत विचारलं जात नाही. आपल्याला फक्त गृहित धरलं जातं, अशी नाराजी काँग्रेस नेत्यांमध्ये होती.

राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार नाही. पण तरीही महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र असल्याचा दावा करत आहेत. पण तरीही काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील संबंध खरंच तितके जवळचे आहेत याबाबत साशंकता व्यक्त केली जातेय.

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे 22 आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना स्वत:च्या पक्षात बघायचा सल्ला दिला होता. ज्यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांची काळजी करु नये, असा टोला नाना पटोलेंनी लगावला होता.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी शिवसेनेसोबत काँग्रेसची नैसर्गिक आणि कायमस्वरुपी युती नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तशी परिस्थिती निर्माण झाल्याने युती झाली होती, असं विधान केलं होतं.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.