Nanar Refinery Project: मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या बारसूच्या प्रस्तावावर पंतप्रधानांचं उत्तर आलं का?; आदित्य ठाकरे म्हणतात…

Nanar Refinery Project: मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या बारसूच्या प्रस्तावावर पंतप्रधानांचं उत्तर आलं का?; आदित्य ठाकरे म्हणतात...
मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या बारसूच्या प्रस्तावाचं काय झालं?; आदित्य ठाकरे म्हणतात...
Image Credit source: tv9 marathi

रिफायनरी प्रकल्प कोकणातच व्हावा म्हणून पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहून बारसू सोलगाव धोपेश्वर रिफायनरीसाठी 13 हजार एकर जागा देण्यासाठी सहमती दर्शवली आहे.

भीमराव गवळी

|

Mar 30, 2022 | 1:26 PM

रत्नागिरी: रिफायनरी प्रकल्प (Nanar Refinery Project) कोकणातच व्हावा म्हणून पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (cm uddhav thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहून बारसू सोलगाव धोपेश्वर रिफायनरीसाठी 13 हजार एकर जागा देण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प कोकणातच मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं का? असा सवाल केला. त्यावर त्यांनाच विचारा, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे  (aaditya thackeray) यांनी देऊन या विषयावर अधिक भाष्य करणं टाळलं. मात्र, रिफायनरी प्रकल्पाबाबत दुमत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करणारा विकास आपल्याला नको आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

रिफायनरी काही लोकांना हवी आहे तर काही लोकांना नको आहे. शिवसेना लोकांसोबत असणार आहे. लोकांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे. तो प्रकल्प कुठे करायचा हे निश्चित झालं नाही म्हणून तुम्ही निश्चित राहा. आंदोलन करण्याची गरज नाही, असं आदित्य ठाकरे यांनी काल कोकणवासियांना सांगितलं.

मुख्यमंत्र्यांना भावना कळवणार

यावेळी त्यांनी रिफायनरी समर्थक आणि विरोधकांची बाजू ऐकून घेतली. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. रिफायनरी प्रकल्पासाठी आम्ही जागा पाहात आहोत. प्रदूषण होणार नाही अशा दृष्टीने प्रकल्प करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कितीही प्रयत्न करा, चिरोटाही पडणार नाही

शिवसेना आणि कोकण हे नातं कोणाला सांगण्याची गरज नाही. यात कोणीही किती प्रयत्न केला तरी यात चिरोटा ही पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच माझा कोकण दौरा राजकीय मोर्चेबांधणीसाठी नाही. तर कोकणच्या विकासावर भर देण्यासाठी आहे. आम्ही फक्त आणि फक्त पर्यटन आणि पर्यावरणावर फोकस दिला आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Nanar Refinery Project: बारसूलाच रिफायनरी प्रकल्प उभारण्याची मागणी का?; वाचा सविस्तर

Nanar Refinery Project : विदर्भात नाणार प्रकल्प नेण्यासाठी काँग्रेस नेता मला भेटला: संजय राऊत

Maharashtra News Live Update : स्टॅम्प ड्युटी वाढणार, घर, फ्लॅट, प्लॅाट नोंदणीसाठी लोकांची गर्दी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें