Marathi Sahitya Sammelan: ‘उद्घाटक म्हणून स्वागत पण भोंग्यावरही बोला’ ‘आप’ने शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात दडलंय काय?

| Updated on: Apr 20, 2022 | 6:46 PM

जिल्ह्यातील उदगीर नगरीत होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला अणखीन दोन दिवस वेळ आहे. असे असतानाच आम आदमी पक्षाने उद्घाटक शरद पवार यांना लिहलेल्या पत्राची चर्चा सबंध जिल्ह्यात होऊ लागली आहे. संमेलन सुरु होण्यापूर्वीच आम आदमी पार्टीने संमेलनाचे उद्घाटक तथा राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहले आहे.

Marathi Sahitya Sammelan: उद्घाटक म्हणून स्वागत पण भोंग्यावरही बोला आपने शरद पवार यांना लिहलेल्या पत्रात दडलंय काय?
95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उ्दघाटन हे खा. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

लातूर : जिल्ह्यातील (Udgir) उदगीर नगरीत होणाऱ्या (Marathi Sahitya Sammelan) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अणखीन दोन दिवस बाकी आहेत. असे असतानाच (AAP) आम आदमी पक्षाने उद्घाटक शरद पवार यांना लिहलेल्या पत्राची चर्चा सबंध जिल्ह्यात होऊ लागली आहे. संमेलन सुरु होण्यापूर्वीच आम आदमी पार्टीने संमेलनाचे उद्घाटक तथा राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एक पत्र लिहले आहे. उद्घाटक म्हणून आपले या साहित्य नगरीमध्ये स्वागत आहे. पण उद्घाटन कार्यक्रमात बोलताना आपण भोंग्या विषयीही आपली भूमिका मांडावी अशा आशयाचे हे पत्र असून साहित्य नगरीला देण्यात आलेल्या नावावरुनही मतभेद असल्याचेही ‘आप’ने दर्शविले आहे. त्यामुळे आपच्या या पत्रातून आता संमेलनावर काय फरक पडणार का हे पहावे लागणार आहे.

काय आहे नेमके पत्रामध्ये ?

राज्यात सध्या सुरु असलेल्या भोंग्याच्या विषयावरुन आपचे प्रदेश अध्यक्ष रंगा राचुरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्र लिहले आहे. यामध्ये तुमचे उदगीर नगरीत स्वागत असून तुमच्या भाषणाची सर्व उदगीरकर हे आतुरतेने वाट पाहत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात भोंग्याच्या रुपाने ध्रुवीकरण केले जात आहे. या अशा अमानवीय घटनांचा उल्लेख संमेलनात होणे गरजेचे आहे. त्यामुळे या घटनांच्या संदर्भात आपले काय मत आहे हे संमेलनातून सर्वासमोर यावे ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आपल्या भाषणातून याबद्दल पुरोगामी महाराष्ट्राला संदेश द्या असाही उल्लेख करण्यात आला आहे. देशात घडत असलेल्या धर्मद्वेशी वातावरणावर संमेलनामध्ये भाष्य असे आपण आयोजकास सुचवू शकतो तो आमचा अधिकार असल्याचाही उल्लेख आहे.

साहित्य नगरीच्या नावावरुनही मतभेद

उदगीर येथे होऊ घालत असलेल्या 95 व्या अखिल भारतीय मरठी साहित्य संमेलनाला स्व. लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. पण ज्या महाविद्यालयात हे संमेलन पार पडत आहे ते उदयगिरी महाविद्यालय हे डॉ. ना.य डोळेंचे आहे. मराठवाडा विद्यापीठामध्येही त्यांची भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे. ते केवळ महाविद्यालयाचे प्राचार्यच नव्हते तर पुरोगामी चळवळीचे नेतृत्वही करीत होते त्यामुळे या साहित्य संमेलनाला प्राचार्य डॉ.ना .य.डोळे यांचं नाव देण्यात यावे असेही पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Marathi Sahitya Sammelan : संमेलनासाठी उदगीर नगरी सज्ज, 2 दिवस आधीपासूनच कार्यक्रमांची रेलचेल

Solapur : शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर ‘स्वाभिमानी’ची हुंकार यात्रा,राजू शेट्टींनी सांगितले ऊस शेतीचे गणित!

CNG rates hike : पुणेकरांना पंधरा दिवसांत दुसरा धक्का, सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या नवे दर