Ashadhi Wari : वारक-यांना टोलमाफी नाहीच! शिंदे सरकारचे आश्वासन टोलवर फोल, कर्मचारी म्हणतात , ‘सरकारचा जीआर दाखवा’

Ashadhi Wari Toll Free : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणा-या वारक-यांच्या वाहनांना टोल माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली. काही टोल नाक्यांवर वारक-यांकडून टोल वसूल झाल्याचा व्हिडिओ वारक-यांनीच व्हायरल केला आहे.

Ashadhi Wari : वारक-यांना टोलमाफी नाहीच! शिंदे सरकारचे आश्वासन टोलवर फोल, कर्मचारी म्हणतात , 'सरकारचा जीआर दाखवा'
टोल माफी कागदावरचImage Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 3:24 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या सरकारला टोल नाके(Toll Naka) जुमानत नसल्याचे ढळढळीत पुरावाच समाज माध्यमांवर व्हायरल केला. मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त पंढरपूरला (Pandharpur) जाणा-या वारक-यांसाठी टोलमाफी जाहीर केली होती. पण टोल नाक्यावर ही घोषणा फोल ठरल्याचे दिसून आले. आषाढी एकादशीनिमित्त टोल नाक्यावर टोल घेणार नसल्याचे जाहीर करुन ही काही टोलनाक्यांवर वारग-यांकडून टोल वसुली झाल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल (Viral)होत आहे. त्यामुळे ही टोलमाफी (Toll Free) केवळ कागदावरच असल्याचे बोलल्या जात आहे. अकोला जिल्ह्यातील वारक-यांना हा अनुभव आला आहे. बीड-उस्मानाबाद रोडवरील पारगावच्या टोल नाक्यावर आयआरबी कंपनीच्या टोल नाक्यावर वारक-यांकडून टोल वसूली करण्यात आली. यावेळी वारक-यांनी टोल माफीची सरकारच्या घोषणेची आठवण करुन दिली, परंतू, कर्मचा-यांने तसा जीआर आहे का? असा उलट प्रश्न वारक-यांना केला. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांचाच आदेश धाब्यावर बसून वारक-यांकडून टोल वसूली झाल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा

काय होती घोषणा?

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणा-या वारक-यांच्या वाहनांना टोल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले होते.

जीआर आहे का?

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केलेली टोलमाफीची घोषणा कागदावरच असल्याचे समोर आले. अकोल्यातील वारकरी बांधवांना हा अनुभव आला. अकोल्यातील काही वारकरी पंढरपूरला जात असताना बीड-उस्मानाबाद रोडवरील एका टोल नाक्यावर त्यांच्याकडून टोल वसूल करण्यात आसला. बीड-उस्मानाबाद रोडवरील पारगावच्या टोल नाक्यावर आयआरबी कंपनीच्या टोल नाक्यावर हा प्रकार घडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलमाफी केल्याच्या घोषणेची यावेळी वारक-यांनी टोल नाक्यावरील कर्मचा-याला आठवण करुन दिली. टोलमाफीचा जीआर आहे का ? असा सवाल करत कर्मचा-याने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला वटाण्याच्या अक्षदा लावल्या. ही घटना वारक-यांनी कॅमे-यात चित्रीत केली आणि ती समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली आहे.

10 जुलै रोजी आषाढी एकादशी

यंदा कोरोनाचे मळभ दूर झाल्याने आषाढी वारीचा सोहळा अविस्मंरणीय झाला आहे. राज्यभरातूनच नाही तर परराज्यातून ही वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मानाच्या पालख्यांनी पंढरपूर जवळ केले आहे. उद्या या पालख्या पंढरपुरात दाखल होतील. 10 जुलैला आषाढी एकादशी आहे.अनेक वारकरी थेट एकादशीदिवशी पंढरपुरात पोहोचतात.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.