काँग्रेस हरलीय, चंद्रकांत खैरेंना हरवण्यासाठी हर्षवर्धनला पाठिंबा : अब्दुल सत्तार

औरंगाबाद:  काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेस हरली आहे, मात्र शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना हरवण्यासाठी आपण हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देत आहोत, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष […]

काँग्रेस हरलीय, चंद्रकांत खैरेंना हरवण्यासाठी हर्षवर्धनला पाठिंबा : अब्दुल सत्तार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

औरंगाबाद:  काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेस हरली आहे, मात्र शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना हरवण्यासाठी आपण हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देत आहोत, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

आमदार हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. काँग्रेसने सुभाष झांबड यांना या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. मात्र झांबड यांना उमेदवारी देताना आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप करत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.  इतकंच नाही तर सत्तार यांनी झांबड यांच्याविरोधात उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र त्यांनी आपला अर्ज मागे घेतला.

आमदार अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती.  त्यामुळे आता अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार का अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन ही चर्चा फेटाळली.

सुभाष झांबड यांना विरोध

काँग्रसने विधानपरिषदेचे आमदार सुभाष झांबड यांना औरंगाबाद मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार नाराज झाले. त्यानंतर त्यांनी बंडखोरी करत काँग्रेसचा विरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांच्या भाजप नेत्यांशी भेटीगाठीही सुरु झाल्या. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्याच पक्षातील औरंगाबादचे लोकसभा उमेदवार सुभाष झांबड यांना विरोध करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, सोमवारी त्यांनी अर्ज मागे घेतला. तसेच,आपण काँग्रेसचं काम करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करणाऱ्या कुणालाही मी मदत करु शकतो, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं.

औरंगाबादेत तिहेरी लढत

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, तर वंचित बहुजन आघाडीकडून आमदार इम्तियाज जलील रिंगणात आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड लढत आहेत. औरंगाबादमध्ये 23 एप्रिलला लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

कोण आहेत अब्दुल सत्तार?

अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.

संबंधित बातम्या 

अब्दुल सत्तार रावसाहेब दानवेंच्या भेटीला  

अब्दुल सत्तार यांची माघार, काँग्रेसला विरोध कायम, मदत कुणाला?  

आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर?   

राशीतून चंद्रमा फिरतोय, चंद्रकांत खैरेंकडून दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल  

औरंगाबाद लोकसभा : कुणाकडे पैसा जास्त, कुणावर गुन्हे अधिक?  

Non Stop LIVE Update
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?
लय फडफड करत होता, बर्फात जाऊन झोपला की.., जरांगेंचा रोख नेमका कोणावर?.
ओमराजे निंबाळकर,अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?
ओमराजे निंबाळकर,अर्चना पाटील यांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रकरण काय?.
प्रचारसभा आटोपून परतत असताना ठाकरे गटाच्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात
प्रचारसभा आटोपून परतत असताना ठाकरे गटाच्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात.
फडणवीसच नाही तर महाजन, शेलारांच्या अटकेचा डाव, शिंदेंचा गौप्यस्फोट
फडणवीसच नाही तर महाजन, शेलारांच्या अटकेचा डाव, शिंदेंचा गौप्यस्फोट.