अजितदादांची भेट घेतल्यानंतर अभिनेता भाऊ कदम यांचा मोठा निर्णय, सांगितली मनातली गोष्ट

अभिनेता भाऊ कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, त्यानंतर चर्चेला उधाण आलं होतं. यावर आता भाऊ कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजितदादांची भेट घेतल्यानंतर अभिनेता भाऊ कदम यांचा मोठा निर्णय, सांगितली मनातली गोष्ट
भाऊ कदम
Image Credit source: social media
| Updated on: Nov 05, 2024 | 3:52 PM

राज्यात विधानसभेचं वारं वाहू लागलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडमोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. त्यातच आता अभिनेता भाऊ कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. भाऊ कदम यांनी अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी जाऊन अजित पवार यांची सदिच्छ भेट घेतली. या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं. भाऊ कदम हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. मराठी बिग बॉसचा विजेता सुरज चव्हाण याच्याप्रमाणे अभिनेता भाऊ कदम देखील आता अजित पवार यांचा प्रचार करणार का याबाबत देखील चर्चा सुरू आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर आता भाऊ कदम यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले भाऊ कदम 

भाऊ कदम यांनी अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाऊ कदम हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर आता भाऊ कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लाडकी बहीण योजनेचं कौतुक केलं आहे, ‘अजितदादांच्या पक्षाचा प्रचार करायला मला आवडेल, एकच दादा अजित दादा आहेत,  त्यामुळे त्यांच्या पक्षाचा स्टार प्रचारक व्हायला मला आवडेल. त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे, आणि त्यांनी आमचे कलाकारांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत, असं भाऊ कदम यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान भाऊ कदम यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी देखील ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. ‘आज प्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. भाऊ कदम यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. श्री. सुनील तटकरे, श्री. सिध्दार्थ कांबळे आणि त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते.’ असं ट्विट अजित पवार यांनी केलं आहे. दरम्यान अजित पवार यांचा प्रचार करायला मला आवडेल, त्यांच्या पक्षाचा स्टार प्रचारक व्हायला मला आवडेल असं भाऊ कदम यांनी म्हलटं आहे. त्यामुळे आता लवकरच भाऊ कदम हे राष्ट्रवादीच्या स्टेजवर दिसण्याची शक्यता आहे.