AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिराची दानपेटी लुटणाऱ्या भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार का? आदित्य ठाकरेंचा रोख पवारांकडे?

Aaditya Thackeray : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

राम मंदिराची दानपेटी लुटणाऱ्या भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार का? आदित्य ठाकरेंचा रोख पवारांकडे?
Aaditya Thackeray on Sharad PawarImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 09, 2026 | 2:51 PM
Share

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडमोडी घडताना पहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिवसेनेची वाट धरली होती. या सर्व राजकीय घडामोडींनंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

पत्रकारांनी आज आमदार आदित्य ठाकरे यांना शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, मला वाटतं तो आमचा प्रश्न नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमचं मत स्पष्टपणे मांडत असतो. आता सगळीकडे लोक बोलायला लागलेली आहेत, लोकं व्यक्त होत आहे, ते राग व्यक्त करत आहेत. महागाई, वीज, पाणीटंचाई यावर लोक व्यक्त होत आहे.

दानपेटी लुटणाऱ्यांसोबत जाणार का?

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘आज जे कुठचेही पक्ष असतील, आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील अधिकृतरित्या किंवा अनधिकृतरित्या भाजपसोबत जाऊ पाहत असतील. त्यांना एवढच विचारत आहे की, जी लोकं राम मंदिराला लुटू शकतात, दानपेटी सोडली नाही, तुम्ही त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणार का? जंतर मंतरला अभिजीत दिपले आणि सोनम वांगचूक आंदोलन करत आहेत. ते या देशासाठी आंदोलन करत आहेत. तुम्ही त्याच्या विरोधात भाजपसोबत जाणार का? सगळेच जे लोक भाजपसोबत जाण्याचा विचार करत आहे त्यांना हा माझा सवाल आहे.’

दरम्यान, गेल्या काही काळापासून शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांची भेटही झाली असल्याचं बोललं जात आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून अद्याप याबाबत अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक