त्या दोघांच्या पक्ष प्रवेशामुळे दिसताना ठाकरे गटाला धक्का पण खरा करंट शिंदेंना, भाजपची मोठी खेळी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डावपेच आखले जात आहेत. यात नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिकेला यश मिळवायचं उद्दिष्टय आहेच. पण भविष्यातील तयारी लक्षात घेऊन राजकीय चाल खेळली जात आहे. भाजपची तशीच तयारी दिसतेय.

त्या दोघांच्या पक्ष प्रवेशामुळे दिसताना ठाकरे गटाला धक्का पण खरा करंट शिंदेंना, भाजपची मोठी खेळी
Uddhav Thackeray-Eknath Shinde (2)
| Updated on: Nov 18, 2025 | 12:46 PM

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इनकमिंग, आऊट गोईंग सुरु आहे. सत्ताधारी भाजपमध्ये येणाऱ्यांच प्रमाण जास्त आहे. सध्या महाराष्ट्रात महायुतीच सरकार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे तीन पक्ष सत्तेत आहेत. पण या तीन पक्षांमध्येच आपसात एक वेगळी स्पर्धा आहे. महायुतीच हित दुय्यम पहिल स्वहिताला प्राधान्य दिलं जात आहे. महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षांतर घडताना दिसत आहे. शिवसेनेचे राष्ट्रवादीत, राष्ट्रीवादीचे शिवसेनेत, शिवसेनेचे भाजप असे काही ठिकाणी पक्ष प्रवेश पहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना बळकट करणं आणि पक्ष विस्तार ही दोन उद्दिष्ट्य या सगळ्या घडामोडींमागे आहेत.

भाजपकडून आज जोरदार शक्ती प्रदर्शन पहायला मिळतय. भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर ‘घर वापसी’ची बॅनरबाजी करत भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. ठाकरे गटातील दोन महत्त्वाचे नेते अद्वय हिरे (Advay Hire) आणि राजू शिंदे (Raju Shinde) हे आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नाशिकमधील मोठे नाव असलेले अद्वय हिरे आणि छत्रपती संभाजीनगरमधील राजू शिंदे यांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम अपेक्षित आहे. भाजपची ताकद वाढणार आहे.

अजून जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका बाकी

दादा भुसे आणि संजय शिरसाट या शिंदे गटातील मंत्र्यांच्या विरोधात विधानसभेत लढलेल्या नेत्यांची ‘घर वापसी’ होत असल्याने, भाजपकडून शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. म्हणजे दिसताना हा उद्धव ठाकरे गटाला धक्का दिसतोय. पण खरा करंट शिंदे गटासाठी आहे. कारण त्यांच्यासमोरील आव्हान वाढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही प्रवेश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. पुढच्या काही दिवसात अजून असे पक्ष प्रवेश पहायला मिळू शकतात. अजून जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका बाकी आहेत.