AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीड वर्षांचं शत्रुत्व संपलं; सावंत बंधू अखेर एकत्र, पुण्यात तानाजीराव-शिवाजीरावांचं मनोमिलन!

Tanajirao Sawant And Shivajirao Sawant Meet: सावंत बंधूंचे मनोमिलन झाल्याचे दिसून आले आहे. दीड वर्षांहून अधिक काळाचा राजकीय दुरावा अखेर संपला आहे.

दीड वर्षांचं शत्रुत्व संपलं; सावंत बंधू अखेर एकत्र, पुण्यात तानाजीराव-शिवाजीरावांचं मनोमिलन!
| Updated on: Oct 06, 2026 | 11:08 PM
Share

सावंत कुटुंबातील मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून चर्चेत असलेला राजकीय दुरावा अखेर संपुष्टात आला आहे. माजी मंत्री आणि आमदार तानाजीराव सावंत तसेच प्रा. शिवाजीराव सावंत या दोन बंधूंचे पुण्यात अखेर मनोमिलन झाल्याचे दिसून आले आहे. कौटुंबिक आणि राजकीय मतभेदांच्या चर्चांमुळे सावंत परिवारातील दुरावा गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, तानाजीराव सावंत आणि प्रा. शिवाजीराव सावंत यांच्यात काही काळापासून राजकीय मतभेद असल्याची चर्चा होती. या मतभेदांमुळे दोन्ही बंधूंच्या राजकीय वाटचालीतही अंतर निर्माण झाल्याचे बोलले जात होते. मात्र पुण्यात झालेल्या भेटीत दोघांनीही जुने मतभेद बाजूला ठेवत एकमेकांशी संवाद साधला आहे. या भेटीमुळे सावंत परिवारातील राजकीय दुरावा आता संपल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

या कौटुंबिक आणि राजकीय पार्श्वभूमीवर प्रा. शिवाजीराव सावंत यांचे चिरंजीव पृथ्वीराज सावंत यांच्या राजकीय भूमिकेचीही चर्चा झाली होती. पृथ्वीराज सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सावंत परिवारातील राजकीय मतभेद अधिकच चर्चेत आले होते. पृथ्वीराज यांच्या भाजप प्रवेशाकडेही या कौटुंबिक राजकीय घडामोडींच्या संदर्भात पाहिले गेले. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ सावंत बंधूंच्या संबंधांबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू होत्या. यानंतर आता त्यांच्या भेटीचा फोटो व्हायरल होताच राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आहे.

मात्र आता दोन्ही बंधू एकत्र आल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पुण्यातील भेटीत झालेले मनोमिलन हे केवळ कौटुंबिक पातळीवरील नव्हे, तर सावंत परिवाराच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जात आहे. तानाजीराव सावंत आणि शिवाजीराव सावंत यांच्यातील मतभेद मिटल्याने सावंत परिवाराची राजकीय ताकद पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात या मनोमिलनाचा स्थानिक तसेच राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?