AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोविड-19 नंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या घरपट्टी व पाणीपट्टी कराची वसुली वाढली

थकीत पाणीपट्टी व घरपट्टी वसूल करण्यासाठी विविध योजना राबवल्या. नेक ग्रामपंचायतीने थकबाकीसह चालू कर भरल्यास सवलत योजना जाहीर केली. याचाच परिणाम म्हणजे ग्रामपंचायतींच्या कर वसुली वाढली आहे.

कोविड-19 नंतर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या घरपट्टी व पाणीपट्टी कराची वसुली वाढली
Tax collection,
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 10:51 AM
Share

पुणे – कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. कोरोना काळात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळ राज्याच्या कर विभागालाही मोठी झळ बसली होती. अनेकठिकाणी घरपट्टी , पाणीपट्टी थकलेली होती. त्याची वसुली करणे कर विभागासाठी मोठे अवघड काम होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कमी होत असलेलया रुग्णसंख्येमुळं आर्थिक स्थिती पूर्वपदावर येत आहे.

कोरोना काळात सर्वसाधारणपणे 17 कोटी 13 लाखांची व पाणीपट्टीची 15 कोटी 71 लाख रुपयांची थकबाकी होती आता परिस्थिती निवळल्यामुळे चालू आर्थिक वर्षांत कर विभागाने थकबाकी वसुलीसह नवीन घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीवर अधिक भर दिला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत करा विभागानं जिल्ह्यात घरपट्टीमध्ये तब्बल 178 कोटी रुपयांची वसुली केली आहे. तर पाणीपट्टीत 29 कोटी 99 लाख रुपयांची वसुली झाली आहे .

विविध योजना राबवल्या

थकीत पाणीपट्टी व घरपट्टी वसूल करण्यासाठी विविध योजना राबवल्या. नेक ग्रामपंचायतीने थकबाकीसह चालू कर भरल्यास सवलत योजना जाहीर केली. याचाच परिणाम म्हणजे ग्रामपंचायतींच्या कर वसुली वाढली आहे. आता पर्यंत 50 टक्के कर वसुली झाली असून, पुढील चार महिन्यांत जास्तीत जास्त कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ऑक्टोबर अखेरपर्यंत सर्वाधिक घरापट्टीही मूळशी तालुक्यातून तब्बल 44 कोटी 25 लाख इतकी वसूल झाली आहे. सर्वाधिक पाणीपट्टी जुन्नर तालुक्यातून 4 कोटी 39 लाख इतकी जमा झाली आहे. तर वेल्हा तालुक्यातून सर्वाधिक कमी घरपट्टी 1 कोटी 12 लाख तर पाणीपट्टी 50 लाख इतकी वसूल झाली आहे

तालुकानिहाय वसूल झालेली घरपट्टी, पाणीपट्टी (ऑक्टोबर अखेरपर्यंत) तालुका             घरपट्टी                          पाणीपट्टी

आंबेगाव        4 कोटी 25 लाख                1 कोटी 77 लाख बारामती        5 कोटी 88 लाख                4 कोटी भोर               5 कोटी 32 लाख                 1कोटी 55 लाख दौंड               7 कोटी 55 लाख                 1 कोटी 48 लाख हवेली             18 कोटी 37 लाख               3 कोटी 41 लाख इंदापूर           6 कोटी 39 लाख                 1 कोटी 98 लाख जुन्नर              18 कोटी 3 लाख                  4 कोटी 39 लाख खेड               10 कोटी 88 लाख                1 कोटी 9 लाख मावळ            14 कोटी 36 लाख                2 कोटी 67 लाख मुळशी           44 कोटी 25 लाख                2 कोटी 31 लाख पुरंदर            5 कोटी 12 लाख                    1 कोटी 99 लाख शिरूर           36 कोटी 49 लाख                 2 कोटी 78 लाख वेल्हा            1 कोटी 12 लाख                      50 लाख

एकूण 178 कोटी 6 लाख 29 कोटी 99 लाख

Antim : The Final Truth Review | ‘मुळशी पॅटर्न’ इतकाच मसाला सोबत सलमान भाईची दमदार अ‍ॅक्शन, वाचा कसा आहे ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’

सोयाबीन दरवाढीला आता सरकारचाही ‘सपोर्ट’, काय होणार नेमका परिणाम?

VIDEO: संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी?, संजय राऊतांचा सवाल; संसदेतील कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.