सोयाबीन दरवाढीला आता सरकारचाही ‘सपोर्ट’, काय होणार नेमका परिणाम?

सोयाबीनच्या दरवाढीबाबत आता सर्वकाही सकारात्मक घडत आहे. आवक कमी असल्याने दरात वाढ तर सुरुच आहे पण ज्या 'स्टॅाक लिमिट' ची भिती शेतरकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये होती ती देखील आता उरलेली नाही. कारण स्टॅाक लिमिट न लावण्याचा निर्णयच आता सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योजक यांच्यावर कोणतेही बंधन राहणार नाही.

सोयाबीन दरवाढीला आता सरकारचाही 'सपोर्ट', काय होणार नेमका परिणाम?
संग्रहीत छायाचित्र

लातूर : सोयाबीनच्या (Soybean price hike) दरवाढीबाबत आता सर्वकाही सकारात्मक घडत आहे. आवक कमी असल्याने दरात वाढ तर सुरुच आहे पण ज्या ‘स्टॅाक लिमिट’ ची भिती शेतरकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये होती ती देखील आता उरलेली नाही. कारण स्टॅाक लिमिट न लावण्याचा निर्णयच आता (government decision) सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योजक यांच्यावर कोणतेही बंधन राहणार नाही. परिणामी सोयाबीनच्या मागणीत अणखीन वाढ होऊन त्याचा परिणाम हा दरावर होणार आहे. सध्या दिवसाकाठी सोयाबीन दरामध्ये 100 ते 150 रुपयांची वाढ होत आहे. आता सरकारच्या या निर्णयाचा परिणाम काय होणार हे देखील महत्वाचे राहणार आहे.

दिवाळीपूर्वी 4 हजार 500 पर्यंत गेलेल्या सोयाबीनचे दर आता दिवसाला वाढत आहेत. सध्या सरासरी 6 हजार 500 चा दर सोयाबीनला आहे. असे असतानाही बाजारपेठेत आवक ही मर्यादितच आहे. तर मागणी वाढत आहे. यातच सोयापेंडची आयात होणार नाही तर आता सोयाबीन साठवणुकीबाबत कोणतेही निर्बंध हे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योजकांवर असणार नाहीत. त्यामुळे अणखीन दर वाढतील असेच चित्र निर्माण झाले आहे.

सरकाचे निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचे

सोयाबीनची बाजारपेठेत आवक सुरु होताच आयात केलेली सोयापेंडही दाखल झाली होती. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली होती. त्यामुळे दर वाढणार का नाही याबाबत शेतकरीही चिंतेत होते. सरकारही शेतकरी हीताचे निर्णय घेत आहे. मध्यंतरी खाद्य तेलाच्या दरावर नियंत्रण रहावे म्हणून तेवबियांच्या साठवणूकीवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे व्यापारी, उद्योजक हे सोयाबीनचू मर्यादितच खरेदी करीत होते. पण आता साठवणुकीवर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. त्यामुळे सोयाबीनची साठवणूक तर होत आहेच शिवाय प्रक्रिया उद्योजकांकडून मागणीही वाढत आहे.

शेतकऱ्यांचाही संयम

सध्या सोयाबीनचे दर वाढत असतानाही सोयाबीनची आवक मात्र, मर्यादितच आहे. यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची गडबड केलेली नाही. शिवाय दर कमी असतानाही केवळ साठणुकीवर भर देण्यात आाला होता. आता दरात वाढ झाली असतनाही प्रत्येक बाजारपेठेत मर्यादित आवक असल्याने दर हे वाढत आहेत अन्यथा स्थिर राहत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी या फार्म्युला वापरल्याने सोयाबीनला महत्व राहिले आहे. आता तर गरज भासेल त्याचप्रमाणे सोयाबीनची विक्री केली जात आहे. शिवाय भविष्यात अणखीन दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

काय होणार बाजारपेठेत ?

आता व्यापारी, प्रक्रिया उद्योजक किंवा स्टॅाकिस्ट यांच्यावर सोयाबीन साठवणुकीबाबत कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. त्यामुळे सोयाबीनच्या साठवणुकीसाठी मागणी वाढणार असल्याने त्याचा परिणाम थेट दरावर होणार आहे. आतापर्यंत केवळ प्रक्रिया उद्योजक हेच लागेल त्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करीत होते. पण आता भविष्यात दर वाढतील या भितीने अधिकची खरेदी करुन ठेवतील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांनो अन्नदाता तर आहातच पण आता उर्जा दाताही व्हा : मंत्री नितीन गडकरी

अळीचा हल्ला थेट तुरीच्या शेंगावर, अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीचे असे करा व्यवस्थापन अन्यथा…

MSP म्हणजे काय ? कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एकच चर्चा…!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI