AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अळीचा हल्ला थेट तुरीच्या शेंगावर, अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीचे असे करा व्यवस्थापन अन्यथा…

पिकालाही सध्याच्या ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागत आहे. सध्या तूर ही फुलोऱ्यात तर कुठे शेंग लागणीच्या अवस्थेत आहे. असे असतानाच शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

अळीचा हल्ला थेट तुरीच्या शेंगावर, अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीचे असे करा व्यवस्थापन अन्यथा...
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 5:23 PM
Share

लातूर : यंदा खरीप हंगामातील उत्पादनाबाबतचे सर्व आराखडे हे हुकलेले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे एकाही पिकाचे शाश्वत उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. आता शेतकऱ्यांची भिस्त अंतिम टप्प्यात असलेल्या तुरीवर होती. मात्र, या पिकालाही सध्याच्या ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागत आहे. सध्या तूर ही फुलोऱ्यात तर कुठे शेंग लागणीच्या अवस्थेत आहे. असे असतानाच शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

सकाळी मोठ्या प्रमाणात धुके आणि दिवसभर ढगाळ वातावरण असाच काहीसा प्रकार मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पाहवयास मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मूग पाठोपाठ खरिपातील तुरही धोक्यातच आहे. अतिवृष्टीचे पाणी शेतामध्ये साचून राहिले होते. त्यामुळे वाढ खुंटून तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता थेट शेंगावरच हल्ला चढवला जात असल्याने उत्पादनाचे काय होणार याची भिती शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र, योग्य व्यवस्थापन केले तर हातातला घास तोंडात जाणार एवढे मात्र, निश्चित आहे.

काय आहे उपाययोजना ?

खरिपातील तूर ही एक तर फुलोऱ्यात किंवा शेंग लागण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे फुलगळ जर होत असेल तर शेतकऱ्यांनी नॅप्थॅलिक अॅसिटिक अॅसिड 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे. शेंग पोखरणारी अळी : फुलगळती बरोबरच शेंग पोखरणाऱ्या अळीचाही धोका काय कमी नाही. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी क्विनॅालफॅास हे 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे. जर किडीचा प्रादुर्भाव अधिकच असेल तर मात्र, इमामेक्टिक बेंझोएट 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे. शेंग पोसण्याच्या अवस्थेत तूर असेल तर फ्ल्युबॅडामाइड 3 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे.

अणखीन दोन दिवस धोक्याचेच

गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदल हा नुकसानीचा ठरत आहे. दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या या बदलाचा थेट परिणाम शेती पिकावर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सदैव सतर्क तर रहावेच लागत आहे. पण किड व्यवस्थापनासाठी अधिकचा खर्चही करावा लागत आहे. अजून तीन दिवस असेच ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यानंतर मात्र, ढगाळ वातावरण कमी होऊन थंडीत वाढ होणार असल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॅा. के.के. डाखोरे यांनी सांगितले आहे.

अशा प्रकारे होते पिकाचे म नुकसान

फुलगळती आणि शेंग पोसण्याची अवस्था म्हणजे तूर ही अंतिम टप्प्यात आहे. मात्र, फुलगळती सुरु झाली की थेट परिणाम हा उत्पादनावर होतो. तर शेंग पोखरणारी अळी ही फुल, कळी आणि शेंग याचे नुकसान करते. या अळीने अंडी घातल्यास किडीचा प्रादुर्भाव वाढून शेंग व्यवस्थित भरत नाही. तुरीच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेतच जर किडीचा प्रादुर्भाव वाढला तर मात्र, शेंग चांगल्या प्रकारे पोसली जात नाही परिणामी उत्पादनावर त्याचा परिणाम होतो.

संबंधित बातम्या :

MSP म्हणजे काय ? कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एकच चर्चा…!

पीएम किसान योजनेत अनियमितता, पण 222 कोटींची वसुली करणार तरी कोण..?

लातूरात स्थिर, अकोल्यात मात्र सोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल ; शेतकऱ्यांसाठी महत्वाचा टप्पा

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.