AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरियाणानंतर भाजपचा आता महाराष्ट्र आणि झारखंडवर डोळा, पण आव्हानं काय?

हरियाणात बहुमत मिळवल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. जम्मूमध्ये ही भाजपला चांगले यश मिळालेय. त्यानंतर आता महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यात निवडणुका होणार आहे. दोन्ही ठिकाणी भाजपपुढे मोठी आव्हानं असणार आहेत. त्यामुळे भाजप यातून कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हरियाणानंतर भाजपचा आता महाराष्ट्र आणि झारखंडवर डोळा, पण आव्हानं काय?
प्रातिनिधिक फोटो
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 09, 2024 | 4:55 PM
Share

मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधासभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. हरियाणामध्ये भाजपने तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तर जम्मूमध्ये ही भाजपला आपली मतं वाढवण्यात यश आलं आहे. त्यामुळे भाजपसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. हरियाणात भाजपला 48 जागा मिळाल्या असून बहुमताचं सरकार स्थापन करत आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती 15 वर्षांनंतर सरकार स्थापन करणार आहे.

हरियाणात सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणारा भाजप हा पहिलाच पक्ष ठरला आहे. हरियाणाच्या स्थापनेपासून आतापर्यंत कोणताही पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आला नव्हता. लोकसभा निवडणुकीत कमी जागा आल्याने भाजपचा आलेख घसरू लागला आहे असे बोलले जात होते. पण हरियाणातील या बंपर विजयाने पक्षाचे मनोबल उंचावले आहे. आता त्याचा परिणाम आगामी तीन राज्यांच्या निवडणुकीतही दिसून येईल.

हरियाणातील पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह भरण्याचं काम नेत्यांना करावे लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते उत्साहीत असून आणखी मेहनतीने मैदानात उतरणार आहेत. येत्या 4 महिन्यांत 3 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली या राज्यांचा समावेश आहे.

दसऱ्यानंतर निवडणुका जाहीर होण्याची शक्यता

निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकांच्या तारखा दसऱ्यानंतर जाहीर करू शकतो. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे आणि झारखंडचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे. त्याचबरोबर 6 राज्यांतील 28 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या तारखाही यासोबत जाहीर केल्या जाऊ शकतात.

महाराष्ट्रात भाजपसाठी आव्हान काय

महाराष्ट्रात सध्या एनडीएचे सरकार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या पुढे मराठा  आरक्षणाचा मोठा मुद्दा आहे. मनोज जंरागे पाटील काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 30 जागावर इंडिया आघाडीला विजय मिळालाय. तर एनडीएला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडी विधानसभेच्या समान टक्केवारीत जागा बदलण्यात यशस्वी ठरली, तर ती एकूण 288 जागांपैकी 160 जागा जिंकू शकते. शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल लोकांची सहानुभूती हे आणखी एक आव्हान असू शकते.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...