
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी निघाले असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अगदी बारामती विमानतळाच्या शेजारीच हा अपघात झाला. या विमान अपघाताचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ पुढे आली. विमान आकाशात असताना एका बाजूला झुकताना दिसले. विमान अपघातानंतर एकही व्यक्ती वाचली नाही. अजित पवार यांच्या जाण्याने राज्यातील राजकारणात भूकंप आला. मात्र, यादरम्यानच पवार कुटुंबातील वादही पुढे आला. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अनेकांनी या शपथविधीनंतर टीका केली. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सध्या चाैकशी केली जात आहे. मात्र, अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी देखील या विमान अपघातानंतर पत्रकार परिषद घेत काही मुद्दे उपस्थित केली.
आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. हेच नाही तर मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातील आमदारांमध्ये अस्वस्था बघायला मिळत आहे. हेच नाही तर काही जणांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्याचीही माहिती मिळत आहे.
अजित पवार गटाचे 30 ते 32 आमदार थेट शरद पवार गटाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आमदारांनी थेट सुप्रिया सुळे यांची भेटही घेतली. तुल्यबळ नेतृत्व राष्ट्रवादी गटाकडे नसल्याची आमदारांमध्ये भीती असल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर या आमदारांना भविष्याची चिंता असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये ज्या प्रकारचे नेतृत्व आहे, त्याप्रकारचे नेतृत्व अजित पवार यांच्या जाण्यानंतर पक्षात दिसत नसल्याने आमदारांमध्ये चिंता आहे. यादरम्यान काही आमदारांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली तर काही आमदार फोनच्या माध्यमातून संपर्कात आहेत. अजित पवार असताना या आमदारांना कशाची चिंता नव्हती पण आता ते अस्वस्थ असल्याच बोलले जात आहे.