मोठी बातमी! महापालिका निवडणुकीनंतर भाजपचा युतीबाबत धक्कादायक निर्णय, शिवसेना शिंदे गटाला मोठा दणका

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे, अनेक महापालिकांमध्ये भाजपची एक हाती सत्ता आली आहे, त्यानंतर आता भाजपनं मोठा निर्णय घेतला असून, हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मोठी बातमी! महापालिका निवडणुकीनंतर भाजपचा युतीबाबत धक्कादायक निर्णय, शिवसेना शिंदे गटाला मोठा दणका
महायुती
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 18, 2026 | 10:39 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. नुकताच महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळालं, राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आली, तर काही महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीची सत्ता आली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी भाजपनं शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती. दरम्यान महापालिका निवडणुकीनंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

महापालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी भाजपनं शिवसेना शिंदे गटासोबत युती केली होती. मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा एकदा स्वबळाची तयारी करत असल्याचं दिसून येत आहे. सोलापुरात जिल्हा परिषद निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे आता भाजप सोलापूर जिल्हा परिषद  निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

नेमकं काय म्हणाले शशिकांत चव्हाण? 

सोलापुरात जिल्हा परिषद निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे.  कोणाचा प्रस्ताव आला तर विचार करू, आमचा प्रतिस्पर्धी हा महायुतीतीलच असेल, दुसरा कोणीही नाही. महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषदेवरही भाजपचे कमळ फडकवल्याशिवाय राहणार नाही.  नगरपालिकेत मागच्यावेळी 31 नगरसेवक होते, आता 131 आलेत त्यामुळे जिल्हा परिषदेतही आमची सदस्य संख्या वाढेल. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही महायुतीच महायुतीचा प्रतिस्पर्धी दिसेल. जिल्हा काँग्रेसमुक्त झालेला आहे, आमच्यासमोर काँग्रेसच प्रतिस्पर्धी होते आणि आता आम्ही काँग्रेसमुक्त जिल्हा केला आहे. भाजप स्वबळावर लढणार आहे, मात्र कोणी प्रस्ताव दिला तर त्याचा विचार केला जाईल, असं यावेळी शशिकांत चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान सोलापूरमध्ये आता जिल्हा परिषद निवडणुका या स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत भाजपकडून देण्यात आले आहेत. इतर ठिकाणी काय निर्णय होणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार  आहे.