
क्रिकेटर स्मृती मानधना हिचं गायक पलाश मुच्छल सोबत लग्न ठरलं होतं, मात्र त्यानंतर पलाश मुच्छल याच्यावर गंभीर आरोप झाल्यानं हे लग्न मोडलं. स्मृती मानधना हिचं लग्न मोडल्यानंतर आता स्मृती मानधनाचा बालमित्र विज्ञान माने याने पलाश मुच्छलवर गंभीर आरोप केले आहेत. पलाश मुच्छल याने 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत त्याने मुच्छलविरोधात सांगली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान एवढंच नाही तर लग्नाच्या दिवशी आपण स्वत: तिथे उपस्थित होतो. पलाशला बेडवर एका महिलेसोबत रंगेहाथ पकडण्यात आल्याचा आरोप देखील विज्ञान माने याने केला होता. विज्ञाने माने याने केलेल्या आरोपांमुळे चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान पलाश मुच्छल याने मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
आपल्याविरोधील सर्व आरोप हे खोटे असून चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा प्रयत्न असल्याचं पलाश मुच्छल याने म्हटलं आहे, दरम्यान विज्ञान मानेनं केलेल्या आरोपांनंतर आता पलाश मुच्छल याने मोठं पाऊल उचललं आहे, त्याने स्मृतीच्या या मित्राला तब्बल 10 कोटींची मानहानीची नोटीस पाठवली आहे. आरोपांमध्ये तथ्य नाही, यामुळे आपली बदनामी झाली असं म्हणत पलाश मुच्छल याने आता विज्ञान मानेला दहा कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे, त्यामुळे आता विज्ञान मानेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान पलाश मुच्छलने नोटीस पाठवल्यानंतर आता विज्ञान माने याने यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. मला जी नोटीस पाठवण्यात आली, त्याला माझे वकील रोहित पाटील हे उत्तर देतील, असं यावेळी विज्ञान माने याने म्हटलं आहे, पुढे बोलताना त्याने पलाश मुच्छलवर गंभीर आरोप केले आहेत. पलाश मुच्छलकडून तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात येत आहे. अंडरवर्ल्डची धमकी पलाश मुच्छलकडून देण्यात आली आहे, असा आरोप देखील माने याने केला आहे, दरम्यान काहीही झालं तरी चित्रपटातील आर्थिक फसवणूक प्रकरणातील न्याय हक्कासाठी आपली लढाई सुरूच राहील, मात्र मुच्छल याच्याकडून आपल्या जीवाला धोका असून, संरक्षण मिळावं, अशी मागणी देखील त्याने आता केली आहे.