…म्हणून अफजलखानानं कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला निवडलं होतं, इंद्रजित सावंतांनी सगळा इतिहासच सांगितला

| Updated on: Nov 13, 2022 | 8:16 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांना मारण्यासाठीच अफजल खानानं कृष्णाजी भास्करला जवळ ठेवलं होतं असं इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी सांगितले.

...म्हणून अफजलखानानं कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला निवडलं होतं, इंद्रजित सावंतांनी सगळा इतिहासच सांगितला
Follow us on

कोल्हापूरः ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी अफजल खान आला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त अफजल खानला मारले नव्हते तर त्याच्यासोबतच्या त्यांच्या अंगरक्षकांना शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांचा खात्मा केला होता असं मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी टीव्ही नाईनशी बोलताना सांगितले.

अफजल खान आणि प्रतापगडावरील कबरीविषयी बोलताना इंद्रजित सावंत म्हणाले की, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा अफजलखानाचा वकील होता.

त्यामुळे अफजल खानानं शिवाजी महाराजांच्या भेटीवेळी त्याला महाराजांना मारण्यासाठीच सोबत ठेवलं होतं असंही त्यांनी सांगितले.

शिवाजी महाराज तलवार उचलणार नाहीत हे अफजलखानाला माहिती असल्यानेच कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला निवडलं होतं असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अफजलखानाचा वध केल्यानंतर हल्ला करायला येणाऱ्या कृष्णाजी भास्करला ‘तुवा मारल्यास महादेव आम्हास हसेल’ हे वाक्य वापरलं होतं असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. मात्र तरीही हल्ला करणाऱ्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा शिवाजी महाराजांनी खात्मा केलाच असं मतही त्यांनी व्यक्त केले.

प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचीच फक्त कबर बांधली होती. या व्यतिरिक्त कोणत्याही कबरीचे तत्कालीन पुरावे सापडत नाहीत. त्यामुळे आता सापडणाऱ्या कबरी या नंतरच्या काळातील असू शकतील असंही त्यांनी स्पष्ट केले.

अफजलखानाच्या कबरीसह सापडलेल्या अन्य कबरीचे ठिकाणाचे शास्त्रीय उत्खनन केल जावं अशी त्यांनी आता मागणी केली आहे. त्यामुळे सर्व माहिती समोर येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच जुन्या माहितीच्या फोटोच्या आधारेच अफजलखानाची कबरही पूर्वीप्रमाणेच केली जावी असंही त्यांनी यावेळी सांगितले.