VIDEO | द्राक्षांची वाहतूक करणारा टेम्पो बस स्थानकात घुसला, नगरमध्ये तरुणाचा मृत्यू

टेम्पोची धडक बसल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर चौघं जण जखमी झाल्याची माहिती आहे. (Ahmednagar Grapes Tempo Bus Stop)

VIDEO | द्राक्षांची वाहतूक करणारा टेम्पो बस स्थानकात घुसला, नगरमध्ये तरुणाचा मृत्यू
अहमदनगरमध्ये द्राक्षाच्या टेम्पोला अपघात

अहमदनगर : द्राक्षांची वाहतूक करणारा टेम्पो बस स्थानकात घुसल्याने अहमदनगरमध्ये अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर चौघे जण जखमी झाले आहेत. अपघातात बस स्थानक आणि काही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. (Ahmednagar Grapes Tempo hits Bus Stop kills one man)

श्रीगोंदा तालुक्यातून द्राक्षांच्या पेट्या घेऊन संबंधित टेम्पो नाशिकच्या दिशेने निघाला होता. पारनेर तालुक्यातून जाताना कान्हूरपठार गावात हा अपघात झाला. टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्थानकात शिरला. अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट आहे.

युवकाचा मृत्यू, टेम्पोचालक ताब्यात

टेम्पोची धडक बसल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर चौघं जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं आहे. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करुन दिला. रस्त्यावर अतिक्रमणे वाढल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याचं यावेळी गावकऱ्यांनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ :

साताऱ्यात कोंबड्यांच्या टेम्पोला अपघात

सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील पाटण ढेबेवाडी येथे कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या अपघातात तब्बल 600 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. चालकाला कोणतीही इजा झालेली नव्हती. मात्र, अपघातात तब्बल 600 कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले.

मध्य प्रदेशात ट्रक उलटला आणि कोंबड्यांची लूट

मध्य प्रदेशातील बडवानी भागात अशीच एक घटना घडली होती. येथे कोंबड्यांची वाहतूक करणारा ट्रक उलटल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी ही गर्दी अपघातग्रस्तांची मदत करण्यासाठी नाही, तर कोंबड्या पळवून नेण्यासाठी झाली होती. यावेळी अपघात झालेल्या ट्रकमध्ये असलेल्या हजार कोंबड्यांपैकी अर्ध्या मृत्युमुखी पडल्या होत्या. तर 300 ते 400 कोंबड्यांची बाकीच्या लोकांनी लूट केली होती.

संबंधित बातम्या :

साताऱ्यात कोंबड्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात, तब्बल 600 कोबड्यांचा मृत्यू

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहनाची धडक, टेम्पो चालक-क्लिनरचा जागीच मृत्यू

(Ahmednagar Grapes Tempo hits Bus Stop kills one man)

Published On - 9:44 am, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI