AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana : मग महाराष्ट्र सोडून चालते व्हा, भिवंडीतील मराठी वाद पेटला, अबू आझमींना नवनीत राणा यांचा करार जबाब, पाकिस्तानचा उल्लेख करत सुनावले काय?

Navneet Rana on Abu Azmi : भिवंडीत मराठीची काय गरज असा माज समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दाखवला. त्यावरून वातावरण तापले आहे. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी आझमींना करारा जबाब दिला आहे. त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत असे सुनावले.

Navneet Rana : मग महाराष्ट्र सोडून चालते व्हा, भिवंडीतील मराठी वाद पेटला, अबू आझमींना नवनीत राणा यांचा करार जबाब, पाकिस्तानचा उल्लेख करत सुनावले काय?
नवनीत राणांनी सुनावले
| Updated on: Oct 01, 2025 | 1:32 PM
Share

Navneet Rana on Abu Azmi : भिवंडीत मराठीची गरज काय? असा माज समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी दाखवला. कायम वादग्रस्त वक्तव्य करून स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न कायम आझमी करत असतात. त्यातून त्यांनी असं वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. मनसेसह भाजप, सेना पक्ष त्यांच्यावर तुटून पडला. तर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी आझमींना करारा जबाब दिला आहे. त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत असे सुनावले. त्यामुळे येत्या काळात हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.

अबू आझमीचे वादग्रस्त वक्तव्य

हे भिवंडी आहे. इथे मराठीची गरज काय? असे अक्कलेचे तारे अबू आझमींनी तोडले. मराठी आणि हिंदीत अंतर काय आहे. मी मराठी पण बोलू शकतो. पण ही भिवंडी आहे. इथं मराठीची गरज काय आहे, असा सवाल करत त्यांनी वाद ओढावून घेतला. अबू आझमी कायम वादग्रस्त बोलतात. त्यात त्यांनी अजून या वक्तव्याची भर टाकली. पण भिवंडी ही महाराष्ट्रात अगदी राजधानीच्या खेटून आहे, याचा विसर अबू आझमींना पडल्याचे दिसले.

महाराष्ट्रातून चालते व्हा

ज्यांना मराठी भाषा आवडत नाही. त्यांनी महाराष्ट्र सोडून चालल जावं, असा जहरी टोला भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अबू आझमींना लगावला. महाराष्ट्र म्हणून इथली भाषा म्हणून पहिला सन्मान केला पाहिजे. हे लोक तर म्हणतात पाकिस्तान देखील चांगला आहे. पाकिस्तानसोबत सामना असला की यांच्याकडून एकही वक्तव्य येत नाही. मग यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी, असा खणखणीत टोला नवनीत राणा यांनी आझमींना लगावला. तर अबू आजमी यांनी नवीन नवीन भानगडी करू नये. ही इथं मराठी भाषा पहिली आहे त्याला कोणी छेडछाड करू नये. नाहीतर अबू आजमी याना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा रवी राणा यांनी दिला.

भिवंडी काय अबू आझमीच्या बापाची आहे?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा या वादात उडी घेतली आहे. त्यांनी अबू आझमी यांना चांगलेच सुनावले आहे. भिवंडी काय अबू आझमीच्या बापाची आहे, असा सवाल त्यांनी केला. मुंब्रा भिवंडीला काहीतरी जाऊन बरळतो. आमच्या भिवंडीतून शिवसेनेचे आमदार निवडून येत होते, भिवंडी आमचा बालेकिल्ला होता. असे वक्तव्य करु नये, भिवंडीतील जनता चोख उत्तर देईल, असे त्यांनी बजावले.

इथं मराठीतच बोललं पाहिजे

आमदार आशिष शेलार यांनी अबू आझमींचे कान टोचले. महाराष्ट्रात मराठी बोललं पाहिजे. भिवंडी काय, गोवंडी काय, चंडी असेल तरी मराठी बोलली पाहिजे. अबू आझमीवर राऊतांची पोपटपंची आणि मनसेची कुठली भाषा हे स्पष्ट करावं, असे ते म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...