AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan School : टिळा-टिकली लावल्यास थेट शिक्षा, कल्याणमधील ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा; पालकांचा संताप, ठाकरे सेनेने विचारला जाब

Kalyan School Controversy Rules : कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी शाळेने धार्मिक सहिष्णुता जपण्याच्या नावाखाली हिंदूच्या धार्मिक आस्था दुखावल्याचे समोर आले आहे. टिळा टिकली लावल्यास शिक्षा देण्याचा फतवाच या शाळेने काढला. त्याविरोधात पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

Kalyan School : टिळा-टिकली लावल्यास थेट शिक्षा, कल्याणमधील 'गांधी' शाळेचा अजब फतवा; पालकांचा संताप, ठाकरे सेनेने विचारला जाब
अजब फतवा
| Updated on: Oct 01, 2025 | 12:01 PM
Share

Kantaben Shantilal Gandhi School : कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी शाळा वादात अडकली आहे. धार्मिक सहिष्णुता जपण्याच्या नावाखाली ही शाळा हिंदूच्या धार्मिक आस्था दुखावत असल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांनी टिळा,टिकली लावल्यास अथवा हातात धागा, बांगडी घातल्यास त्यांना शिक्षा देण्यास येईल असा अजब फतवा या शाळेने काढला. त्याविरोधात पालकांचा संताप अनावर झाला. त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे तक्रार दिली. तर या प्रकाराविरोधात उद्धव सेना सुद्धा आक्रमक झाली. त्यांनी व्यवस्थापनासह मुख्यध्यापकांना धारेवर धरले. यावेळी मोठा तणाव झाला. पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला.

कल्याणच्या शाळेचा अजब फतवा

शाळेत विद्यार्थ्यांना टिळा-टिकली आणि हातात धागे बांधण्यास शाळेने बंदी घातली. जर कोणी टिळा, टिकली अथवा हातात धागा घालून आले तर त्याला शिक्षा देण्यात येईल असा फतवा कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी स्कूलने काढला. त्यामुळे पालक संतप्त झाले. त्यांनी या शाळेची तक्रार थेट कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे केली.

अगोदर फतवा मग कानावर हात

हा अजब फतवा काढल्यानंतर वातावरण तापले. प्रकरण अंगावर शेकत असल्याचे दिसताच या शाळेच्या व्यवस्थापनाने मग साळसूद भूमिका घेतली. त्यांनी असा काही प्रकार केला नसल्याची भूमिका घेतली. घाबरलेल्या व्यवस्थापनाने मग आपल्या भूमिकेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. आम्ही कुठला फतवा काढला नाही. शाळेत धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी फक्त सूचना दिल्या असा कांगावा या शाळेने केला. पण यातून शाळा प्रशासनाने फतवा काढल्याचे मान्य केले.

कडा व बांगडीने इजा होऊ नये यासाठी आम्ही ते बंद केलेले आहे त्याचबरोबर टिळा धागे यामुळे शाळेत धार्मिक वाद होत असल्याने त्यादेखील काढाव्या अशा सूचना पालकांना दिल्याचे शाळेचे म्हणणे आहे. शाळेचे सिक्रेटरी मनोहर पालन, स्वप्नाली रानडे रानडे शाळा डायरेक्ट आणि मुख्याध्यापक संजय पाटील यांनी त्यांची बाजू मांडली.

ठाकरे गटाने विचारला जाब

दरम्यान हा प्रकार समजताच उद्धव ठाकरे गटाने शाळेत धाव घेत व्यवस्थापनाला जाब विचारला. शाळा प्रशासनाचे संचालक मुख्याध्यापक आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत ठाकरे गटा आक्रमक झाला. आम्ही इतर धर्माला सांगतो का टिळा किंवा टिकली लावा. त्यांच्यासाठी आमच्या धर्मावर बंदी का? असा थेट सवाल त्यांनी विचारला. आम्ही सर्व धर्माचा आदर करतो असे म्हणत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. बैठकीत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शाळेचे संचालक,मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. तर यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.