‘जर शरद पवार अजितदादांसोबत आले तर…’, राणेंचं मोठं भाकीत

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर बोलताना नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

जर शरद पवार अजितदादांसोबत आले तर..., राणेंचं मोठं भाकीत
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 27, 2025 | 4:52 PM

मुंबईला पावसानं झोडपून काढलं आहे, अनेक ठिकाणी पाणी साचलं, नागरिकांचे हाल सुरू आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला होता, आदित्य ठाकरे यांच्या आरोपांनंतर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राणे यांनी आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, दरम्यान या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नारायण राणे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले नारायण  राणे? 

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार कोणासोबत जास्त टिकत नाहीत, जर ते अजित पवार यांच्याबरोबर आले तर साहजीकच ते बरोबर आले तर आमचा फायदा होईल, आमचा पक्ष मोठा आहे. आम्ही ठरवू काय आणि कसं करायचं असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल  

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईत पाऊस पडतो,  जुलै ऑगस्टला अधिक पाऊस पडतो. सरकारला मदत करायची सोडून हे टीका करतात. एकनाथ शिंदेंना नावं ठेवता. तुम्हाला नावं ठेवली तर? आदित्य ठाकरेंना धड मराठी बोलता येत नाही, तोतरे बोलतात. आम्ही नक्कल केली तर काय होईल? उद्धव ठाकरेंची नक्कल केली तर काय होईल? आरशात तुमचे चेहरे बघा, अमित शाह यांचं नाव घेऊ नका, अडचणीत येताल, असा इशारा नारायण राणे यांंनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.

भ्रष्टाचाराबाबत उद्धव ठाकरे यांनी बोलू नये. डिनो मोरियाच्या कितीतरी कंपन्या आहेत. केतन कदम मिठी नदी प्रकरणात अटकेत आहेत. डिनो मोरियाचे कदमशी संबंध आहेत.  माझ्याकडे 19985  पासूनचा हिशोब आहे. परदेशातील गुंतवणुकीची माझ्याकडे माहिती येत आहे. अमित शाह,  मोदी,  भाजप हे शब्द उद्धव ठाकरेंनी उच्चारू नयेत. आता वीस आमदार आहेत, पुढच्यावेळी पचही नसतील असा टोला राणे यांनी लगावला आहे.