गाव कारभाऱ्यांनो, जय-परायज विसरुन संधीचं सोनं करा; अजितदादांचं आवाहन

या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. (Ajit Pawar appeal to all Maharashtra Gram Panchayat Winners)

गाव कारभाऱ्यांनो, जय-परायज विसरुन संधीचं सोनं करा; अजितदादांचं आवाहन
ajit pawar
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 5:46 PM

मुंबई : “गाव कारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना केले आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज (18 जानेवारी 2020) जाहीर झाले. या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (Ajit Pawar appeal to all Maharashtra Gram Panchayat Election Results Winners)

“स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी आता तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे,” असेही अजित पवार म्हणाले.

“स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा,” असे अजित पवार निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना दिलेल्या संदेशात म्हटले.

महाविकासआघाडीच्या गटाला चांगला प्रतिसाद – अजित पवार

दरम्यान काही वेळापूर्वी अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. यात महाविकासआघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीच्या गटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या गटाचा देखील पराभव झाला आहे. तर या ठिकाणी कर्जत जामखेड आमदार रोहित पवार यांच्या गटाचा विजय होताना दिसत आहे,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. (Ajit Pawar appeal to all Maharashtra Gram Panchayat Election Results Winners)

संबंधित बातम्या : 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची धामधूम, अजित पवारांची प्रतिक्रिया

अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: चौंडी गावात राम शिंदेना पुन्हा धक्का, आमदार रोहित पवारांची बाजी

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.