AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar death in plane crash : अजितदादांच्या निधनाचा प्रचंड धक्का, समर्थकाचा तीव्र अटॅकने मृत्यू

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळ विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेत त्यांच्यासह सुरक्षा रक्षक, पायलट व कर्मचारीही मरण पावले. अजितदादांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना अंत्यदर्शन घेतलं. दरम्यान, अजित दादांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या एका कट्टर समर्थकाचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Ajit Pawar death in plane crash : अजितदादांच्या निधनाचा प्रचंड धक्का, समर्थकाचा तीव्र अटॅकने मृत्यू
अजित पवार यांच्या निधनाने कट्टर समर्थकाला धक्का
| Edited By: | Updated on: Jan 30, 2026 | 12:25 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी सकाळी बारामतीजवळ अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान लँडिंगवेळेस क्रॅश झालं आणि स्फोट होऊन पेट घेतला. यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच या विमानात त्यांच्यासोबत असलेले अजितदादांचे अंगरक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट सुमीत कपूर, को-पायलट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. अजित पवार यांच्या या अकस्मात निधनाने पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला. अख्खा महाराष्ट्रही अजित दादांच्या जाण्यामुळे हळहळला.

बुधवारी सकाळपासूनच बारामतीमध्ये अजित पवारांचे समर्थक, चाहते, तसेच बारामतीकर जनतेची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. ज्या रुग्णालयात अजित दादांचं पार्थिव ठेवलं होत, त्याबाहेर लोकांचा अक्षरश: जनसमुदाय जमला होता. काल (गुरूवार) काटेवाडी येथे अजित दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. तिथेही हजारो लोकांनी येत दादांना अखेरचा निरोप दिला. त्यानंत विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात हजारोंच्या जनसमुदायासमोर अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परत या परत या अजित दादा परत या.. एकच वादा अजित दादा, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यसंस्कार पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रूंना खळ नव्हता.

अजितदादांच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही, समर्थकाचा तीव्र अटॅकने मृत्यू

दरम्यान अजित दादांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या समर्थकाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. अजित दादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने समर्थकाचे निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार सुदाम बोडके असे मृत समर्थकाचे नाव असून ते 63 वर्षांचे होते.

सुदाम बोडके हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित होते. ते दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावचे रहिवासी होते. बुधवारी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं. त्याच दिवशी  सुदाम बोडके हे आपल्या एका मित्राच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. तिथून परत येत असताना त्यांना अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळाली. ही बातमी समजताच त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते अत्यंत अस्वस्थ झाले. प्रकृती खालावत असल्याने सुदाम बोडके यांनी तातडीने नाशिककडे हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ते स्वतःच्या गाडीने रुग्णालयाकडे निघाले. मात्र हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सुदाम बोडके हे अजित दादांचे कट्टर कार्यकर्ते आणि चहते म्हणून संपूर्ण परिसरात परिचित होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ढकांबे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली शाखा सुदाम बोडके यांनीच सुरू केली होती. सुदाम बोडके यांच्या अचानक निधनामुळे ढकांबे गावासह दिंडोरी तालुक्यात शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले