Ajit Pawar plane crash : अजितदादांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडीओ समोर, अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्याचं निधन झालं, आता या विमान अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे, आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार मुंबईवरून बारामतीकडे निघाले होते, मात्र हे विमान बारामतीमध्ये धावपट्टीवर उतरत असतानाच हा अपघात झाला, विमान धावपट्टीवर उतर असताना विमानाचं नियंत्रण सुटलं. विमान थेट जमिनीवर धडकलं विमान जमिनीवर धडकताच मोठा स्फोट झाला, त्यानंतर या विमानाला भीषण आग लागली. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत पायलटचा देखील मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर हा अपघात नेमका कसा झाला? याचा एक व्हिडीओ समोर आला होता, सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं.
जिथे अपघात झाला तिथे शेताजवळ असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी हा अपघात झाल्याचं पहिल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अपघातावेळी घटनास्थळी मोठा स्फोट झाला आणि विमानाने पेट घेतला. अपघातापूर्वी हे विमान हवेत घिरट्या घालत होतं, असं देखील या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.
दरम्यान त्यानंतर आता अजित पवार यांच्या विमान अपघाताचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हवेतच हे विमान तिरक झाल्याचं दिसून येत आहे. हे विमान तिरकं झाल्यानंतर काही वेळातच हे विमान जमिनीवर कोसळलं. या संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे ही अपघाताची घटना या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. धावपट्टीवर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान जमिनीला धडकलं. विमान जमिनीला धडकताच मोठा स्फोट झाला, आणि त्यानंतर विमानाला आग लागली. दरम्यान कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताच्या तपासाला सुरुवात झाल्याची माहिती नगरिक विमान वाहतूक मंत्र्यांकडून देण्यात आली आहे. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
