AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Death in Plane Crash : विमान फिरून आलं, पलटी होऊन कोसळलं.. क्षणात स्फोट आणि… अपघात स्थळी नेमकं काय घडलं ? प्रत्यक्षदर्शी महिलेने सगळंच सांगितलं..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामतीजवळ खाजगी विमान अपघातात दुःखद निधन झाले. लँडिंगवेळी झालेल्या या भीषण दुर्घटनेत त्यांच्यासह इतर सहा जणांचाही मृत्यू झाला. आगीच्या ज्वाळांनी वेढलेले विमान आणि प्रत्यक्षदर्शींच्या वर्णनाने या घटनेची भीषणता समोर आली. या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे.

Ajit Pawar Death in Plane Crash : विमान फिरून आलं, पलटी होऊन कोसळलं.. क्षणात स्फोट आणि... अपघात स्थळी नेमकं काय घडलं ? प्रत्यक्षदर्शी महिलेने सगळंच सांगितलं..
अपघातस्थळी नेमकं काय घडलं ?Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jan 28, 2026 | 11:39 AM
Share

अजितदादा अजितदादा.. अजित पवार या नावपेक्षा सगळीकडे दादा याच नावाने ओळखले जाणारे, परखड वाणी पण तितकीच मिश्कील कोटी करणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच आज निधन झालं. बारामतीजवळ त्यांच्या खाजगी विमानाला लँडिंगदरम्यान अपघात झाला , ते खाली कोसळलं आणि क्षणात आगीच्या ज्वाळांनी वेढलं गेलं. या दुर्दैवी अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह विमानात असलेल्या इतर सहा जणांनीही अपघातात जीव गमावला. सकाळी पावणेनऊच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते. अख्ख्या महाराष्ट्राला या दुर्दैवी घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.

आगीच्या ज्वाळांनी वेढलंल विमान, त्याचे इकडे तिकडे विखुरलेले, पसरलेले अवशेष आणि आग विझवण्याचे अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न. बारामची जवळच्या शेतात जिथे हा अपघात झाला, तिथे सकाळपासून हेच दृश्य होतं. धुराच्या लोटांमुळे सगळीकडे काळोख होता, त्यातच आगीच्या ज्वाळांची धगही होती. लँडिंग करताना लो व्हिजिबलटीमुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. बारामतीमधील चार सभांसाठी आज अजित पवार सकाळी मुंबईङून निघाले. बारामतीमध्ये धावपट्टीवर विमान अगदी जवळ आलं होतं, मात्र तेवढ्यात विमानंचं नियंत्रण गमावलं आणि ते धाडकन खाली कोसळलं. क्षणात आगीच्या ज्वाळांनी ते वेढलं गेल, त्यामुळेआतमधले सगळेच गंभीर जखमी झाले. भीषणता एवढी तीव्र होती की कोणीच वाचण्याची शक्यता अगदी कमी होती. आणि थोड्याच वेळात ती दुर्दैवी बातमी आली. अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाल्याची डीजीसने पुष्टी केली आणि अख्खा महाराष्ट्र दु:खात बुडाला.

अपघात झाला तेव्हा नेमकी तिथे काय परिस्थिती होती, याचा आखोदेखा हाल, तिथल भीषण दृश्य आजूबाजूच्या गावकऱ्यांनी पाहिलं. त्यांनीच मदतीला धाव घेत आग विझवण्याचाही प्रयत्न केला. मात्र तिथलं भाषण दृश्य, आजूबाजूला पडलेले विमानाचे अवशेष मृतदे हे दृश्य पाहून अनेकांना धक्काच बसला. घटनास्थळी नेमकं काय झालं, विमान अपघात कसा घडला याचा संपूर्ण आंखोदेखा हाल प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला आहे.

तिथे नेमकं काय घडलं ?

आज सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान हा दुर्दैवी अपघात झाला. पहिल्यांदा ते विमान आलं होतं, नीट गेलं मात्र नंतर ते फिरून आलं. गावाकडून आल्यावर ते विमान खूप खालून, खालच्या दिशेहून गेलं मात्र धावपट्टी वरच्या दिशेने होती, पण ते खाली आल्यामुळे पुन्हा वरच्या दिशेने जाऊ शकलं नाही. खाली धावपट्टीच्या इथे ते क्रॉस झालं आणि अचानक पलटी झालं.धडकून त्याबरोबर एकदम विमानाचा स्फोट झाला. तेव्हा आम्ही तिथे जवळच होतं. स्फोट झाल्यावर तो प्रचंड आवाज ऐकून आम्ही हादरलो , खूप घाबरलो होतो. घराच्या पाठीमागे त्या विमानाचे सगळे पार्ट्स पडलेले होते.

एवढी आग होती की कोणीच काही करू शकलं नाही

अपघात झाल्याचं कळल्यावर आम्ही लगेच अधिकाऱ्यांना वगैरे फोन करून माहिती दिली, विमानतळाच्या जवळ अधिकारी, पोलिस वगैरे आले. पण एवढा मोठा स्फोटो झाला होता, आग लागली होती की कोणीच काहीच करू शकत नव्हतं. अग्निशमन दलाचे जवान तिकडे आले. त्यांनी पाणी टाकून आग वगैरे विझवली. त्यांनी, पोलिसांनी आम्हाला पाणी आणायला सांगितलं, बादली बादली भरून आम्हीच तिथे पाणी घेऊन आलो, ते टाकलं. बराच वेळ तिथे स्फोट होत होते, आग धगधगत होती, विझतच नव्हती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी महिलेने दिली.

अजित पवारांचे निधन; पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली, ट्विटमध्ये काय?
अजित पवारांचे निधन; पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली, ट्विटमध्ये काय?.
अपघातात अजित पवारांचा मृत्यू, संजय शिरसाट यांच्याकडून श्रद्धांजली
अपघातात अजित पवारांचा मृत्यू, संजय शिरसाट यांच्याकडून श्रद्धांजली.
... अन् रुग्णालयाबाहेर युगेंद्र पवार धाय मोकलून रडायला लागले
... अन् रुग्णालयाबाहेर युगेंद्र पवार धाय मोकलून रडायला लागले.
अजित पवारांच्या निधनाने शोककळा; अनिल देशमुखांना यांना अश्रू अनावर
अजित पवारांच्या निधनाने शोककळा; अनिल देशमुखांना यांना अश्रू अनावर.
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार दिल्लीहून बारामतीसाठी रवाना
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार दिल्लीहून बारामतीसाठी रवाना.
राज्याचं राजकारण अळणी, बेचव झालं! दादांच्या जाण्याने राऊतही झाले भावुक
राज्याचं राजकारण अळणी, बेचव झालं! दादांच्या जाण्याने राऊतही झाले भावुक.
अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
अजित पवार यांचा मृत्यू; हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले!
अजित पवार यांचा मृत्यू; हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले!.
अजित पवारांचा हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर
अजित पवारांचा हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर.
भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू
भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू.