मोठी बातमी! अजितदादांचे आमदार शरद पवारांना भेटणार? वेळ अन् ठिकाणही ठरलं?

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. अजितदादांचे आमदार हे शरद पवारांना भेटणार आहेत. यासाठी त्यांनी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोठी बातमी! अजितदादांचे आमदार शरद पवारांना भेटणार? वेळ अन् ठिकाणही ठरलं?
sharad pawar news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 10, 2026 | 3:05 PM

ऐन दिवाळीतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची भेट झाली होती. या भेटीत दोघांनी बराच वेळ चर्चा केली होती. दोघांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादीत संवाद सुरू झाल्याचे दिसत आहे. प्रफुल पटेल यांच्यानंतर आता अजितदादांचे आमदार देखील शरद पवारांंना भेटणार आहेत. त्यांनी शरद पवारांच्या भेटीसाटी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितदादांच्या आमदारांनी शरद पवारांना भेटीसाठी वेळ मागत पहिलं पाऊल टाकलं आहे. या आमदारांनी बुधवारी भेटीसाठी वेळ मागितली आहे . त्याआधीच पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुबीयांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. सध्या शरद पवार हे मुंबईतच आहे. ते पुढील काही दिवस मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी आराम करणार असल्याची माहिती पवार कुटुंबीयांनी दिली. एकीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. सुनील तटकरे यांनी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीची कल्पना दिली होती. अजितदादा असते, तर राष्ट्रवादी एकत्र आली असती, असं त्यांनी म्हटलं. या चर्चेदरम्यान अजितदादांचे आमदार हे शरद पवारांना भेटणार आहेत. या भेटीत शरद पवार आणि अजितदादांच्या आमदारांमध्ये काय चर्चा होते, याकडे लक्ष लागलं आहे.

Loading...

शरद पवारांच्या भेटीनंतर राजेश टोपे काय म्हणाले?

तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश टोपे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर टोपे म्हणाले, आज शरद पवार यांना भेटलो. आम्ही कौटुंबिक आणि तब्येतीची त्यांची विचारपूस केली. तसेच मराठवाड्याच्या दुष्काळावर चर्चा झाली. त्यांनी मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती कशी आहे, याविषयीची माहिती घेतली. आजच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही आहे, त्यामुळे विलीनीकरणाच्या संदर्भात आम्ही काय बोलणार, आम्ही दादा असताना एकत्रित येणार होतो, हे आम्ही तेव्हा सुद्धा मान्य केल आहे, पण त्यांनी तेव्हा ही गोष्ट नाकारली होती’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us