AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajesh patil : गोकुळचं अध्यक्षपद मिळालं, आता पुढे काय? राजेश पाटलांची पहिली प्रतिक्रिया, सगळा प्लॅन सांगितला!

Rajesh patil gokul chairman : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजेश पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गोकुळचं वैभव वाढवणार, गेल्या वर्षभरातील तोटा भरून काढण्यासाठी नियोजन करणार, असं त्यांनी सांगितलं. तसेच विरोधकांनाही सोबत घेऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

Rajesh patil : गोकुळचं अध्यक्षपद मिळालं, आता पुढे काय? राजेश पाटलांची पहिली प्रतिक्रिया, सगळा प्लॅन सांगितला!
rajesh patil gokul chairmanImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 10, 2026 | 3:41 PM
Share

अखेर गोकुळ दूध संघाची मोठी कोंडी फुटली आहे. कोल्हापूरमधील गोकुळच्या या सत्तासंघर्षात महायुतीने बाजी मारली असून शशिकांत युचेकर यांचा पराभव करत आता राजेश पाटील यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मी 5 लाख दुध उत्पादकांचे मी आभार मानतो. आज 63 वर्षानंतर चंदगडसारख्या भागाला अध्यक्षपद मिळाले. वर्षभरात मी 31 लोकांना संचालकांना घेऊन मी सर्वांचे हित लक्षात घेऊन मी काम करेल. गोकुळचे वैभव मी अजुन वाढवण्यासाठी काम करेल. गोकुळचा तोटा भरुन काढण्यासाठीही काम करेल. झाले गेले विसरुन गोकुळसाठी आपण काम करुयात. सर्व दुध उत्पादकांचे हित समोर ठेवुन काम करणार.झालेला तोट भरुण काढण्यासाठी मी काम करणार, असं म्हणत राजेश पाटील यांनी पुढील धेय्य सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाले राजेश पाटील?

मी प्रथमतः सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांचे आणि मतदारांचे आभार मानतो. माझ्यावर दूध संघाची जबाबदारी सोपवली आहे. मी सर्वांसाठी हिताचं काम करेन. गोकुळचं वैभव वाढवण्यासाठी मी प्रयत्न करेन. गेल्या वर्षभरातला तोटा भरून काढण्यासाठी नियोजन करु. कोर्टातून आदेश प्राप्त झाल्यानंतर निवड प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणुकीच्यावेळी विरोधक होतो आता त्यांनीही सर्वानी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय करुयात. त्यासाठी हातात हात घेऊन काम करुयात, अशी अपेक्षा आहे. झालेलं विसरुन एकदिलान काम करुयात. पुढील पाच वर्ष बाकीचं सर्व राजकारण बाजूला ठेऊयात. दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करु, 63 वर्षांनंतर चंदगडसारख्या भागाला नेतृत्त्व मिळालं, अशी प्रतिक्रिया राजेश पाटील यांनी यावेळी दिली आहे.

अखेर महायुतीचीच बाजी

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. सतेज पाटील यांच्या आघाडीचे शशिकांत पाटील-चुयेकर यांचा पराभव झाला. मतदानात 13 विरुद्ध 16 असा निकाल लागला आहे. त्यानंतर ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Follow Us
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?