अजित पवार ‘नॉट रिचेबल’, राजकारणात मोठ्या घडामोडी, पोलिसांचा फाैजफाटा सोडून चक्क…

महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना सध्या दिसत आहेत. त्यामध्येच पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. त्यामध्येच महत्वाची बैठक पुण्यात आली. मात्र, त्यानंतर अजित पवार एकटेच निघून गेले.

अजित पवार नॉट रिचेबल, राजकारणात मोठ्या घडामोडी, पोलिसांचा फाैजफाटा सोडून चक्क...
Ajit Pawar
| Updated on: Dec 27, 2025 | 12:36 PM

राज्यात महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अर्थात शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येऊन महापालिका निवडणुका लढणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. काही पदाधिकाऱ्यांनी याला थेट विरोधही केला. आता दोन्ही पक्षातील बैठकीतील चर्चा फिस्कटली. दिवसभरातील राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री घेतला. दरम्यान रात्री उशिरा महाविकास आघाडीतील घटक पक्षांची जागावाटपाच्या बैठकांना पुन्हा सुरुवात होती. मात्र, आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे. यादरम्यान अजित पवार बारामती हॉस्टेवरील बैठकीनंतर थेट मोबाईल बंद करून एकटेच निघाले. त्यांनी माझ्या मागे कोणीही येऊ नका असे थेट सांगितले.

अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाले. हेच नाही तर पोलिसांचा मोठा फाैजफाटाही तिथेच बाहेर त्यांची वाट पाहात राहिला. पायलट कार आणि सर्व सुरक्षा सोडून अजित पवार एकटेच निघून गेले. यामुळे बैठकीत नेमकं काय घडलं की, अजित पवार एकटेच निघून गेले यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याचे आता जवळपास स्पष्टच आहे.

अजित पवार नॉट रिचेबल झाल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. अजित पवार नेमके कुठे आहेत हा प्रश्न त्यांच्या सुरक्षारक्षकांनाही पडला. यापूर्वी ज्या ज्यावेळी अजित पवार नॉट रिचेबल झाले आहेत, त्यावेळी राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला. एका खासगी वाहनातून ते बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना झाले. यावेळी त्यांनी सुरक्षारक्षकांनाही घेतले नाही आणि निघून गेले.

उपमुख्यमंत्री अजित पवार बारातमी हॉस्टेलमधून ज्या वाहनाने रवाना झाले ते वाहन अखेर नुकताच त्यांच्या पुण्यातील जिजाई निवासस्थानी दिसले आहे. मात्र,  अजित पवार जिजाई निवासस्थानी आहेत की नाहीत याबाबत माहिती देण्यास कर्मचाऱ्याचा नकार दिला आहे. यामुळे पुण्यात काहीतरी मोठं सुरू असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता मिळण्यासाठी अजित पवार यांच्याकडून प्रयत्न केली जात आहेत.