AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : …तर टळला असता अजित पवारांच्या विमानाचा अपघात, नवी माहिती समोर

अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. ते मुंबईवरून बारामतीला निघाले होते. विमान लँड होण्यापूर्वीच विमानाने नियंत्रण गमवलं, त्यानंतर ते जमिनीवर येऊन धडकलं, आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar Plane Crash : ...तर टळला असता अजित पवारांच्या विमानाचा अपघात, नवी माहिती समोर
Ajit PawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 28, 2026 | 4:41 PM
Share

महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना आज घडली आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. अजित पवार हे मुंबईहून बारामतील निघाले होते. मात्र विमान धावपट्टीवर उतरत असतानाच विमानाने नियंत्रण गमावलं आणि हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पहायला मिळत आहे. अनेक नेते देखील आता बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उद्या बारामतीमध्ये येणार आहेत. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला? याबाबत आता एव्हियशन एक्स्पर्ट विशाल बांगरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले विशाल बांगरे? 

ज्या विमानाचा अपघात झाला, ते  विमान बंबार्डियरचं लियरजेट विमान होत, यापूर्वीही अनेकदा या विमानातून अजित पवारांनी प्रवास केला होता. जे काही मेट्रोलॉजीमधून माहिती मिळाली त्यानुसार विझिबिलिटी कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. पायलटने सुरक्षेच्या दृष्टीने व्हीआयपी ऑन बोर्ड असताना दक्षता घेतली होती, आधी विमानाचा एक राऊंड घेतला नंतर लँडिंगचा प्रयत्न केला, पायलटने ‘मेडे’ कॉल देखील दिला होता, परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाते तेंव्हाच पायलट मेडे कॉल देतो.

पायलटला त्यावेळी जी गोष्ट योग्य वाटली, ती त्याने केली, त्यावेळी त्याने तो निर्णय घेतला.  हवामानाची परिस्थिती तशी बदलत असते, त्याप्रमाणे धुक्यामुळे व्हिजिबिलिटी कमी असल्यानं त्याने  लँडिंग केल्याचा प्रयत्न प्रथमदर्शनी दिसून येत आहे, उड्डाणापूर्वी विमानाच्या प्रत्येक गोष्टी चेक केल्या जातात, पायलट स्वत: विमान चेक करतो, सगळे क्लियरन्स मिळाल्याशिवाय विमानाचं उड्डाण करता येत नाही, अशी माहिती विशाल बांगरे यांनी दिली आहे. दरम्यान जर विझिबिलिटी स्पष्ट असती तर कदाचित हा अपघात टळला असता अशी आता या अपघातानंतर तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले