Ajit Pawar Plane Crash: पाहिलं तर अजित पवारांचा मृत्यू… प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, विमानाला आग लागली, 4 – 5 स्फोट झाले आणि…
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणाचं मोठं नुकसान... अपघातापूर्वी नक्की काय घडलं? प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नक्की काय झालं होतं...

Ajit Pawar Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आहे. बारामती येथील गोजुबावी परिसरातील धावपट्टीवर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि ते शेतात कोसळलं. या अपघातात अजित पवार यांच्यासोबत सहा जणांचा मृत्यू झाला. बारामती याठिकाणी सभेला जात असताना अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी नक्की काय आणि कसं घडलं… याबद्दल मोठी माहिती दिली आहे. आधी विमानाला आग लागली आणि त्यानंतर चार ते पाच स्फोट झाले… अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशातून विमान एका बाजून तिरकं झालेलं दिसत होतं. अशी माहिती एका स्थानिकाने दिली. तर विमातून खर-खर आवाज येत होता… अशी माहिती घटनास्थळी राहणाऱ्या एका नागरिकाने दिली आहे. विमान पडेल असं वाटत होतं. आमच्यामध्ये चर्चा देखील सुरु होती की, असा आवाज का येत आहे? जवळपास सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. धावपट्टीजवळ विमानाचे दोन राऊंड झाले. पण विमान खाली उतरु शकलं नाही.
अन्य एका नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्यानंतर आम्ही काय झालं पाहायला आलो, तेव्हा विमान अपघात झाल्याचं कळलं. विमानाला आग लागली होती आणि त्यानंतर चार – पाच स्फोट झाले. त्यानंतर लोकांची गर्दी जमली… मदतीला देखील अनेक जण धावत आले. पण आग सर्वत्र पसरली होती, त्यामुळे मदत पोहचू शकली नाही. पण विमान अपघातात अजित दादा होते… ही आमच्यासाठी सर्वात धक्कादायक गोष्ट होती. पायलट याने देखील विमान लँड करण्याचा प्रयत्न केलाच असेल. पण ते शक्य झालं नाही. धावपट्टीच्या 100 फूट जवळ आल्यानंतर विमान अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर अजित पवार यांना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे…. असं देखील नागरिकांनी सांगितलं आहे.
बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या हृदयद्रावक दुर्घटनेत अजित पवारांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांसह या विमानात असलेल्या ६ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिली आहे.
