Maharashtra Election News LIVE : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचधातूचा कारखाना उभारणार
Live Updates In Marathi : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्या सभापतीवर अविश्वास ठराव मंजूर. सभापती रामहरी जाधव यांच्याविरोधात 13 विरुद्ध 0 मतांनी ठराव संमत. भाजप-राष्ट्रवादी संचालकांचा ठरावाला पाठिंबा, शिवसेनेचे पाच संचालक गैरहजर. प्रशासकीय कारभारावर आक्षेप; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी.

देशभरातील दहा कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनीही या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे धाराशिव जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी मुंबईत हालचाली सुरू आहेत. महायुतीमधील राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे तब्बल 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर आहे. भाजपची सत्ता स्थापनेसाठी सावध भूमिका. आमदार तानाजी सावंत यांचे 8 जिल्हा परिषद सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुती सोबत आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीत सत्ता वाटपाचे सूत्र ठरल्याची चर्चा असून अध्यक्षपद भाजपकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर महत्त्वाची सभापती पदे शिवसेनेला देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. समृद्धी महामार्गावरील सांगवी परिसरातील एका पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या कांद्याच्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना पहाटे दोनच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक पुण्याकडून नागपूरकडे जात होता. सांगवी येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी ट्रक थांबवण्यात आला होता.
LIVE NEWS & UPDATES
-
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचधातूचा कारखाना उभारणार
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी पंचधातू कारखान्याचा प्रस्ताव असून कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंत आणि भाविकांसाठी पंचधातू वस्तूंची मोठी मागणी असल्याने स्थानिक पातळीवर उत्पादन वाढवण्यासाठी हा कारखाना उभारण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे. तसेच पर्यटकांसाठी डबल डेकर बसही सुरु करण्याची योजना आहे.
-
अजितदादांच्या अपघाताची चौकशी नेमकी कुठपर्यंत आली, सुरज चव्हाण यांचे ट्वीट
अजितदादांच्या अपघाताची चौकशी नेमकी कुठपर्यंत आली याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला मिळायला हवी. आपण राज्याचे प्रमुख म्हणून पुढाकार घेऊन चौकशीची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुरज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्वीटरद्वारे केली आहे.
-
-
अल्पवयीन मुलीचा छळ करणाऱ्या आरोपीस कोर्टात आणताना महिलांनी चोपले
अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन करण्याच्या प्रकरणातील आरोपीवर न्यायालयात हल्ला झाल्याचा प्रकार घटला आहे. अहिल्यानगर येथील श्रीरामपूर न्यायालयाबाहेर संतप्त महिलांनी आरोपीला चोपल्याचा प्रकार घडला आहे. न्यालयात हजर करण्यासाठी आरोपीला घेऊन जात असताना हा प्रकार घडला आहे.
-
गुळानी घाटात विद्यार्थ्यांची बस आणि डंपरचा अपघात
गुळानी घाटात विद्यार्थ्यांची बस आणि डंपरचा अपघात
पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील गुळानी घाटातील घटना
अपघातात बसमधील सात ते आठ विद्यार्थी जखमी
जखमी विद्यार्थ्यांवर राजगुरुनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू
-
सोनच्या दरात 500 रुपयांची वाढ, चांदी झाली स्वस्त
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात प्रति तोळा 500 रुपयांची वाढ
चांदीच्या दरात प्रति किलो मागे 1 हजार रुपयांची घसरण
सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 60 हजार 680 रुपयांवर
चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 72 हजार 950 रुपये
-
सांगलीमध्ये किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी आंगणवाडी सेविकांचे थाळीनाद आंदोल
किमान वेतन कायदा लागू करावा, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळीनाद करत अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकार विरोधात धरणे आंदोलन केले आहे.
-
जळगावा जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन
जळगावा जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांचे विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन
केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अंगणवाडी सेविकांच्या वतीने आंदोलन
आंदोलनाला मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविकांची उपस्थिती
-
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या विविध योजनातील सवलत धारक किंवा योजनेअंतर्गत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी यापुढे स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे एसटी महामंडळाने व्यवहारात पारदर्शकता यावी आणि प्रवाशांना सुलभ सेवा मिळावी म्हणून नॅशनल कॉमन मेबिलिटी कार्ड या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा अवलंब करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून नुकताच ईबिक्स टेक्नॉलॉजीस लि.आणि एन एस डी एल पेमेंट बँक यांच्याशी करार केला आहे.
-
CET प्रवेश नोंदणीला मुदतवाढ
CET प्रवेश नोंदणीला मुदतवाढ… MCA हॉटेल मॅनेजमेंटसाठी 18 फेब्रुवारीपर्यंत मुदत.. 18 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली
-
दादांच्या आशीर्वादानेच रेवतीचं लग्न ठरलं आहे- सुळे
दादांच्या आशीर्वादानेच रेवतीचं लग्न ठरलं आहे. सगळं कुटुंब रेवतीच्या लग्नाविषयी 30 तारखेला घोषणा करणार होतं. अजितदादा असतानाच हे लग्न ठरलं याचं समाधान असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
-
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना ईडीचं समन्स
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना ईडीचं समन्स. ‘फेमा’ कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडी चौकशी करणार. सिंग पिता-पुत्रावर स्विस बँक खात्यासह काही परदेशी मालमत्तांचे लाभार्थी असल्याचा आरोप. जालंधरमधील ईडी कार्यालयात उद्या चौकशीसाठी हजर राहणार.
-
निवडणुकीत महायुतीकडून पैशाचा महापूर- उद्धव ठाकरे
निवडणुकीत महायुतीकडून पैशाचा महापूर. पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही. येणार उद्याचा काळ आपला असेल. ZP आणि पंचायत समितीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची टीका.
-
मुंबई शहरात १२००हून अधिक बांग्लादेशी घुसखोर
बांगलादेशी घुसखोरी मुद्दा शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. मुंबई शहरात १२००हून अधिक बांग्लादेशी घुसखोर आहेत. एटीएसने त्यांची यादी घोषित केली आहेत्यांची नावे व फोटो जाहीर करायला हवे.त्यांच्याकडे प्राप्त कागदपत्रे पोलिसांनी रद्द करावी शिवडी, काळाचौकी, येलो गेट येथील नावे आहेत. मनीषा कायंदे यांनी मागणी केली आहे. ही नावे तात्काळ घ्या त्यांची कागदपत्रे रद्द करा यावर कारवाई झाली पाहिजे या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले.
-
परभणी महापालिकेत उद्धवसेनेचा महापौर-उपमहापौर
परभणी महापालिकेत काँग्रेस आणि उबाठाचे महापौर उपमहापौर निवडून आले आहेत,तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागलाय. उबाठाकडून सय्यद इकबाल 39 मते घेऊन महापौर झालेत तर काँग्रेसचे गणेश देशमुख 38 मते घेऊन उपमहापौरपदी निवडून आले आहेत. परभणी महापालिकेत काँग्रेस आणि उबाठाचे महापौर उपमहापौर निवडून आले आहेत,तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागलाय. भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांना 26 मते घेत पराभवाचा सामना करावा लागलाय. उबाठाचे उमेदवार सय्यद इकबाल यांना 39 मते मिळाली असून ते महापौर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमहापौर पदाच्या उमेदवार नाजीमा बेगम शेख अब्दुल रहीम यांना 27 मते मिळाली असून काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर पदाच्या निवडणुकीत 38 मते घेऊन उपमहापौरपदी निवडून आले आहेत.
-
नाशिकमध्ये कामगार धोरणांविरोधात आज संप
केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात आज देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. नाशिकमध्ये संयुक्त कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. गोल्फ मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा नेण्यात येत आहे. या मोर्चात कामगार, कर्मचारी, कंत्राटी व असंघटित क्षेत्रातील कर्मचार्यांचा सहभाग आहे. नव्या चार श्रम संहितांना तीव्र विरोध करण्यात आला आहे. कंत्राटी, हंगामी व फिक्स टर्म पद्धतीला आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. समान कामाला समान वेतनाची मागणी करण्यात आली आहे.
-
कामगार कायदे रद्द करा या मागणीसाठी सोलापुरात मोर्चा
केंद्र शासनाने नव्याने लागू केलेले कामगार कायदे रद्द करा या मागणीसाठी सोलापुरात मोर्चा आयोजित करण्यात आला. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या कामगार संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात येत आहे. सोलापुरातील दत्त नगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येत आहे. कामगार श्रम संहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरात कामगार संघटनांनी संपाची हाक दिलीय
-
आपण नव्याने हलीपॅड बांधत नाही आहोत
आपण नव्याने हलीपॅड बांधत नाही आहोत. जेट्टी ची जागा आपण त्यात कॉन्व्हर्ट करत आहोत. महालक्ष्मी येथील हलीपॅड येथे अनेक निर्बन्ध आहेत. म्हणून आपण ते करत आहोत. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे सचिन आहिर यांनी उवस्थित केलेल्या प्रश्नावर स्पष्टीकरण दिले.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे महानगरपालिकेत
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाच वाजता ठाणे महानगरपालिकेमध्ये सदिच्छा भेट देणार आहेत. त्याच बरोबर ठाण्याचे महापौर पदी शिवसेनेचे अनुसूचित जाती sc प्रवर्गातून शर्मिला पिंपोळलकर यांची सभागृहात महापौर पदी बिनविरोध निवड करण्यात आल्यानंतर मात्र महापौर दालनात असलेल्या महापौर खुर्चीवर तब्बल 8 दिवसानंतर शर्मिला पिंपोळलकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित महापौर खुर्चीवर विराजमान होणार आहेत. तसेच गट नेते पदी शिवसेनेचे पवन कदम आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची देखील सदिच्छा भेट घेणार आहेत.
-
मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला या वेळीही आदित्य ठाकरेंची दाडी
मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला या वेळी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी दांडी मारली. मागील बैठकांना सुद्धा आदित्य ठाकरे गैरहजर राहीले होते.
-
मतांच्या जोरावर आमचा महापौर-खासदार संजय जाधव
आम्ही म्हणत होतो त्याप्रमाणे उबाठाचा महापौर झालाय, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आम्ही शिवसेनेला परभणीतून महापौर दिलाय असे खासदार संजय जाधव म्हणाले. भाजपवाले दावा करत होते,दावा तर कुणी पण करू शकते, अपक्ष सुद्धा दावा करू शकते, आमच्याकडे मत होती,मताच्या जीवावर आम्ही महापौर आमचा होईल असा दावा करीत होतो. आम्ही मनपात चांगल काम करू अस असा विश्वास व्यक्त केला.
-
राज ठाकरे आणि संजय राऊत यांची तासाभरापासून बैठक सुरू
राज ठाकरे आणि संजय राऊत यांची 1 तासापासून शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. चंद्रपूर येथे झालेल्या एकूणच प्रकरणाबद्दल राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्याच चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण डोंबिवली आणि नाशिक वरून मनसेला जाब विचारणाऱ्या संजय राऊत यांच्या आणि ठाकरे सेनेच्या भूमिकेबाबत मनसेही नाराज असल्याची माहिती.
-
परभणीच्या महापौरपदी शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल
शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल हे परभणीचे महापौर झाले आहेत. ठाकरे गटाचे इक्बाल यांना 39 मतं मिळाली. भाजपच्या उमेदवार तिरूमला खिल्लारे यांना 26 मतं मिळाली. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक अक्षय देशमुख राहिले तटस्थ.
-
ठाणे – शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने अनोखं आंदोलन
ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात वृक्षतोडीच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आलं आहे. वृक्ष लावत सरकारला इशारा दिला .
उन्नत महामार्गामुळे अनेक वृक्ष ठाणे शहरामध्ये बाधित होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह इतर नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. बाधित झालेल्या झाडांच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं आहे.
येत्या 20 फेब्रुवारीला ठाणे महापिका सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून वृक्षतोडीबाबत आवाज उचलला जाणार आहे.
-
सांगली – जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी अजित पवार गट,काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आज बैठक
सांगली जिल्हा परिषदेतल्या सत्ता स्थापनेला आता वेगा आला आहे.जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची बैठक होणार आहे. जिल्हा परिषदेत कोणाबरोबर जायचं हे आद्यप ठरलेलं नाहीये, मात्र जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्याबरोबर आज सायंकाळी बैठक होणार आहे.
-
अजित पवार गटाचे नेते मूग गिळून गप्प का आहेत? शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा सवाल
अजित पवार गटाचे नेते मूग गिळून गप्प का आहेत? रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांना का पडत नाहीत. सुनील तटकरे , प्रफुल्ल पटेल का गप्प आहेत? सगळे प्रश्न विचारत असताना त्यांचे नेते मात्र बोलत नाही. अजित पवार यांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाही हे स्पष्ट होत असताना का बोलत नाही? असा सवाल शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला.
-
प्रफुल पटेल यांच्या फोननंतर दादांनी प्रवासाचा निर्णय बदलला; प्रमोद हिंदुराव यांचा मोठा दावा
प्रफुल पटेल यांच्या फोननंतर दादांनी प्रवासाचा निर्णय बदलला, असा मोठा दावा कल्याणमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी केला आहे. प्रफुल पटेल यांचा मंत्रालयातील फाईल संदर्भात फोन आल्यानंतर दादांनी ‘बाय रोड’ जाणं रद्द केलं. आधीच गाडीत टाकलेल्या बॅगा पुन्हा उतरवून चार्टर्ड फ्लाइटने जाण्याचा निर्णय घेतला, असा दावा त्यांनी केला आहे.
-
दादाच राहिले नाहीत, कुणाबद्दल जुनं काय काढायचं? 12 तारखेच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
आज एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत. रोहितची अस्वस्थता साहजिक आहे. आमचं कुटुंब अडचणीच्या काळातून चाललंय. एकमेकांना आधार देत आम्ही पुढे जातोय. पारदर्शक चौकशी होईल, असं आश्वासन फडणवीसांनी दिलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी 12 तारखेबद्दल प्रश्न विचारला असता “दादाच राहिले नाहीत, कुणाबद्दल जुनं काय काढायचं,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
-
शरद पवारांची प्रकृती आता उत्तम- सुप्रिया सुळे
शरद पवारांची प्रकृती आता उत्तम आहे. रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे मी आभार मानते. सुनेत्रा पवारांवर आता मोठी जबाबदारी आली आहे. आज एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे दु:ख आहे. अजितदादांचं वय हे जाण्याचं नव्हतं. दादा आज आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
-
ठाणे महापालिकेची येत्या २० फेब्रुवारीला विशेष सभा होणार
ठाणे महापालिकेची येत्या २० फेब्रुवारीला विशेष सभा होणार असून विविध समित्यांसह विरोधी पक्षनेत्याची निवड होणार आहे. स्थायी समिती सदस्य, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, स्विकृत नगरसेवकांसाठी या पदांवर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यांची निवड महापौर करणार आहेत. यापूर्वी महासभेत स्विकृत नगरसेवकांची संख्या फक्त पाच होती. मात्र यंदापासून ही संख्या आतां दहा करण्यात आली आहे. ही संख्या पक्षीय बलाबलानुसार ठरवण्यात येते. निवडून आलेल्या सदस्यांच्या तुलनेत संबंधित पक्षाच्या वाट्याला स्विकृत सदस्य येतात.
ठाणे महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरांची निवड ३ फेब्रुवारी रोजी झाली. महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौरपदी कृष्णा पाटील यांची वर्णी लागली आहे. या विशेष सभेनंतर आता पहिली महासभा येत्या २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
-
पैठण इथल्या एका इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्याला अमानुष मारहाण
छत्रपती संभाजीनगरमधील पैठण इथल्या एका इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. शिक्षक राहुल बोरकर यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिक्षकावर कारवाई न झाल्यास मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे.
-
नाशिकमध्ये विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत
नाशिकमध्ये विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत होईल. उद्धव ठाकरे ठरवतील तोच विरोधी पक्षनेता होईल, अशी माहिती ठाकरे सेनेचे महानगरमुख प्रगमेश गीते यांनी दिली. सिंहस्थाच्या कामांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवणार असून विकासाच्या बाबतीत सोबत राहू, मात्र गैरप्रकार केल्यास विरोध करू, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.
-
अंजनगाव सुर्जीमध्ये रेती माफियांची मुजोरी; कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी परिसरात अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर रेती माफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटेच्या सुमारास महसूल अधिकारी योगेश लंगडे आणि त्यांच्या पथकाने रेतीने भरलेला एक डंपर पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी डंपर चालकाने डंपर न थांबवता पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि पाठलागादरम्यान पकडले जाऊ नये म्हणून डंपरमधील तब्बल ८ ते १० ब्रास रेती रस्त्यावरच सांडवून दिली. इतकेच नव्हे तर, तस्करांनी महसूल अधिकारी योगेश लंगडे यांना धक्काबुक्की करत अरेरावी केली. याप्रकरणी आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, रेती माफियांनी कायद्यालाच आव्हान दिल्याने अंजनगाव सुर्जीतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
-
अजितदादांच्या आठवणींचा अनमोल खजिना! बारामतीत दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन
बारामती शहरातील नटराज कला दालनामध्ये सध्या एका अनोख्या आणि भावूक प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्याचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्ये अजितदादांचा लहानपणापासूनचा प्रवास, राजकारणातील त्यांचे सुरुवातीचे दिवस, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालील सक्रिय राजकारण, तसेच लग्नसमारंभ आणि भाऊबीज यांसारख्या सणांमधील कौटुंबिक आणि हळवे क्षण टिपण्यात आले आहेत. दादांच्या त्या दिलखुलास हास्याची आणि करारी नेतृत्वाची आठवण करून देणाऱ्या या चित्रांना पाहण्यासाठी बारामतीकरांनी नटराज कला दालनात मोठी गर्दी केली आहे.
-
नितीन गडकरींचा नवा गडकरी वाडा सज्ज
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपूरमधील ऐतिहासिक महाल भागातील ‘गडकरी वाडा’ आता पूर्णपणे नव्या आणि पर्यावरणपूरक रूपात साकारला आहे. पारंपरिक कोकणी आणि केरळी वास्तुकलेचा प्रभाव असलेल्या या घराचे वैशिष्ट्य म्हणजे याचे आधुनिक शाश्वत तंत्रज्ञान. नागपूरच्या ५० अंशांच्या उन्हाळ्यातही घर थंड ठेवण्यासाठी यात ‘हॉलो ब्रिक्स’ (पोकळ विटा) आणि स्लॅबमध्ये विशेष पाइपलाइनचा वापर करण्यात आला आहे. ऊर्जा बचतीच्या या प्रभावी वापरामुळे या घराला ‘प्लॅटिनम रेटिंग’ मिळाले असून, असे मानांकन मिळवणारे हे नागपुरातील पहिले खाजगी घर ठरले आहे. नुकताच गडकरी यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह या वाड्यात गृहप्रवेश केला असून, या पूजेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
मृत्यूच्या दाढेतून परतला तरुण, रेल्वे कर्मचारी आणि मासेमारांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
पश्चिम रेल्वेच्या वैतरणा खाडीवरील पुलावर एक भीषण दुर्घटना घडली असून, धावत्या लोकल ट्रेनमधून एक प्रवासी थेट खाडीच्या पात्रात कोसळला. उदय मंगेश वांगड (२५, रा. बोईसर) असे या प्रवाशाचे नाव असून तो बोईसरहून बोरिवलीकडे जात असताना हा अपघात झाला. मात्र, रेल्वे कर्मचारी रमेश सिंग यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदतीसाठी पावले उचलली. त्यांची हाक ऐकून वाढीव गावातील गुरु पाटील आणि साई पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली बोट घेऊन रेल्वे पुलाखाली धाव घेतली आणि बुडणाऱ्या उदयला सुखरूप बाहेर काढले. या देवदूतांच्या सतर्कतेमुळे उदयला जीवदान मिळाले असून, त्याच्या आईने अश्रूपूर्ण नयनांनी सर्वांचे आभार मानले आहेत. सध्या या तिघांवरही सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच, नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचले, मातोश्रीबाहेर बॅनरबाजी
मुंबईत भाजपचा महापौर विराजमान झाल्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांच्या समर्थकांनी थेट मातोश्रीच्या अंगणात जोरदार बॅनरबाजी करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. बोललो होतो मुंबईचा महापौर हिंदू होणार, मराठी होणार आणि महायुतीचा होणार; जय श्री राम, मुंबई लव्ह महादेव, असा आक्रमक मजकूर या बॅनरवर पाहायला मिळत आहे. ही बॅनरबाजी ‘मातोश्री’च्या अगदी जवळ झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी रात्रीच हे बॅनर हटवले असून इतर ठिकाणचे फलकही काढण्याचे काम सुरू केले आहे.
-
पवार कुटुंबियांनीच सत्य बाहेर काढलं, अजित पवारांच्या अपघातावरून संजय राऊतांचा घणाघात
अजित पवारांच्या अपघाताचं सत्य पवार कुटुंबियांनी बाहेर काढलं. तपास यंत्रणांवर विश्वास राहिला नाही. देवेंद्र फडणवीस सांगतात तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा. सरकारवर विश्वास नाही, तपास यंत्रणांवर देखील विश्वास नाही, असे विधान संजय राऊत यांनी केले.
-
छत्रपती संभाजीनगर: जैतापूर येथील सामूहिक कॉपी प्रकरणात जिल्हा परिषदेचे तीन शिक्षक निलंबित
जैतापूर येथील सामूहिक कॉपी प्रकरणात जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. खाजगीत संस्थेच्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे संस्थाचालकाला आदेश दिले. परीक्षा केंद्रावरील 327 विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका जप्त केल्या. इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये घडला होता सामूहिक कॉपी करण्याचा प्रकार. कॉपी केल्याप्रकरणी संपूर्ण गुण रद्द करून इंग्रजी विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार. CCTV कॅमेरात रेकॉर्ड झाला होता छत्रपती संभाजी नगरच्या जयतापुर येथील सामूहिक कॉपीचा प्रकार…
-
नाशिकच्या रामकुंड परिसरात घाटांची संख्या वाढवली जाणार
आगामी सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. रामकुंड गोदा घाट परिसरात आणखी एक ते दोन घाट तयार केले जाणार. कुंभमेळा दरम्यान कोटीच्या घरात भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर घाटांची संख्या वाढवली जाणार आहे. सध्या रामकालपथच्या कामाचे खोदकाम सुरू झाले आहे.
-
उमरगा पंचायत समितीच्या सभापती पदावरून महायुतीमध्येच जोरदार रस्सीखेच
भाजपाकडून जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्यासाठी तयारी सुरु तर शिवसेनेकडून माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या आकांक्षा चौगुले यांच्यासाठी तगडी फिल्डिंग लावण्यात आली आहे. सभापती पद सर्वसाधारण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असून भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी आपापली ताकद लावल्याचे चित्र दिसत आहे. भुसणी गणातून कैलास शिंदे तर केसर जवळगा गणातून आकांक्षा चौगुले विजयी झाले आहेत.
-
सोलापुरात भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी
सोलापुरात भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी जमली आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 567 इच्छुकांनी पक्षाकडे मागणी केली. स्वीकृत नगरसेवक पदासाठी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि पद्माकर काळे यांची नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. आगामी विधानसभांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पदाधिकाऱ्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे. निवडणुकीत ज्यांनी अर्ज माघार घेऊन निष्ठेने उमेदवार निवडून आणले त्यांचाही स्वीकृतसाठी विचार होणार. 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी स्वीकृत नगरसेवक जाहीर होणार आहेत.
-
नाशिकच्या रामकुंड परिसरात घाटांची संख्या वाढवली जाणार
नाशिकच्या रामकुंड परिसरात घाटांची संख्या वाढवली जाणार. आगामी सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी. रामकुंड गोदा घाट परिसरात आणखी एक ते दोन घाट तयार केले जाणार. कुंभमेळा दरम्यान कोटीच्या घरात भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता. याच पार्श्वभूमीवर घाटांची संख्या वाढवली जाणार. सध्या रामकालपथच्या कामाचे खोदकाम सुरू.
-
बोनसच्या रकमेसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांची पायपीट
शासनाकडून मिळणाऱ्या बोनसच्या रकमेसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांची पायपीट. धान खरेदी केंद्र संस्थांनी गैरकारभार केल्याने शेतकऱ्यांना बसतोय फटका. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील 1447 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत. संबंधित संस्थांकडून फक्त पैसे परत घेऊन चालणार नसून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 15 दिवसांच्या आत बोनस मिळाला नाही तर पणन कार्यालयात फटाके फोडत आंदोलन करणार असल्याचा इशारा सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला.
-
भाजपच्या नगरसेवकांना समित्यांवर संधी; पाच वर्षांत तीन वेळा सदस्यपद
महापालिकेत भाजपचे 119 नगरसेवक निवडून आल्याने महापौर, स्थायी अध्यक्ष व सभागृह नेते वगळता उर्वरित सदस्यांना पुढील पाच वर्षांत किमान तीन वेळा विविध समित्यांवर संधी मिळणार आहे. शहर, शिक्षण, विधी, महिला व बालकल्याण, नाव व क्रीडा अशा सहा समित्यांमध्ये प्रत्येकी 13 सदस्य असून त्यात भाजपचे 10 सदस्य असतील. दरवर्षी 77 नगरसेवकांना समिती सदस्यपद मिळेल. स्थायी समितीत भाजपचे 12 सदस्य असणार आहेत. सदस्यांची नावे शुक्रवारी जाहीर होणार आहेत.
-
समृद्धी महामार्गावरील कांद्याच्या ट्रकला अचानक आग
समृद्धी महामार्गावरील सांगवी परिसरातील एका पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या कांद्याच्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना पहाटे दोनच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक पुण्याकडून नागपूरकडे जात होता. सांगवी येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी ट्रक थांबवण्यात आला होता. डिझेल भरल्यानंतर गाडी सुरू करत असताना स्टार्टरमध्ये स्पार्क झाला आणि क्षणार्धात ट्रकने पेट घेतला.
-
धाराशिव जिल्हा परिषद सत्तास्थापनेसाठी मुंबईत हालचाली सुरू
महायुतीतील राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे तब्बल 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर. भाजपची सत्ता स्थापनेसाठी सावध भूमिका. आमदार तानाजी सावंत यांचे 8 जिल्हा परिषद सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुती सोबत मुंबईत. मुंबईत झालेल्या बैठकीत सत्ता वाटपाचे सूत्र ठरल्याची चर्चा असून अध्यक्षपद भाजपकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर महत्त्वाची सभापती पदे शिवसेनेला देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे.