Ajit Pawar Death : अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्याला सुपर लाईट का म्हणतात? वाचा…
Ajit Pawar Plane Crash : अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला जात असताना विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त झालेले हे विमान लिअरजेट 45 होते. या विमानाला सुपरलाईट असेही म्हणतात.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या अपघातात दोन वैमानिकांसह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात अजित पवार यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश आहे. या अपघातानंतर संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून चार्टर्ड विमानाने बारामतीला जात असताना हा अपघात झाला. अपघातग्रस्त झालेले हे विमान लिअरजेट 45 असल्याची माहिती समोर आली आहे. या विमानाला सुपरलाईट असेही म्हणतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लिअरजेट 45
लिअरजेट 45 विमान हे कॉर्पोरेट आणि व्हीआयपी प्रवासासाठी वापरले जाणारे ट्विन-इंजिन लाइट बिझनेस जेट आहे. हे विमान लहान आणि छोट्या विमानतळांवर लँडिंगसाठी आणि कमी अंतराच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आलेले आहे. या विमानाची सुरुवात 1990 च्या दशकात झाली होती.हे सेस्ना सायटेशन एक्सेल सारख्या लोकप्रिय आणि मोठ्या-केबिन विमानांशी स्पर्धा करण्यासाठी डिझाइन करण्यात आले होते.
लिअरजेट 45 ला सुपर-लाइट का म्हणतात?
लिअरजेट 45 या विमानाला अनेक कारणांमुळे सुपरलाइट म्हटले जाते. सुपर-लाइट जेट्स आपली उच्च गती आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ओळखले जाते. हे 8 सीटर विमान डबल क्लब व्यवस्थेसाठी ओळखले जाते. या विमानात गॅलरी आणि वॉशरूम असते. जरी या विमानाला सुपर-लाइट असले म्हटले जात असले तरी यात आरामाची खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे विमान 3.5 तासांपर्यंतच्या प्रवासासाठी आदर्श मानले जातात. त्यामुळे हे विमान प्रायव्हेट जेट म्हणून वापरले जाते.
हे जेट 16 वर्षे जुने होते का?
अजित पवारांना घेऊन प्रवास करत असलेले बॉम्बार्डियर लिअरजेट 45 चा टेल नंबर VT-SSK आणि सिरीयल नंबर 45-417 होता. हे एक 16 वर्षे जुने विमान होते. हे अपघातग्रस्त विमान दिल्लीतील व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे होते. विमानाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या विमानात सुरक्षिततेच्या समस्या नव्हत्या. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विजय कुमार सिंग यांनी म्हटले की, विमान 100% सुरक्षित होते आणि कर्मचारी अत्यंत अनुभवी होते. हा अपघात कमी दृश्यमानतेमुळे झाला असावा, मात्र अपघाताचे नेमके कारण डीजीसीएच्या चौकशीनंतरच कळेल.
