एकीकडे अकवान चक्रीवादळ, दुसरीकडे थंडीची लाट; महाराष्ट्राला मोठा इशारा; पुढील दोन दिवसांनंतर….

अकवान चक्रीवादळाचा विदर्भावर कोणताही प्रभाव पडणार नसल्याची माहिती नागपूर हवामान विभागाने दिली आहे. चक्रीवादळ कमजोर पडले असून ते विदर्भाच्या पुढे गेले आहे. बंगालमध्ये त्याचा मोठा प्रभाव दिसला, मात्र विदर्भात पाऊस झालेला नाही. त्यामुळे विदर्भातील नागरिकांना चक्रीवादळाचा फटका बसणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

एकीकडे अकवान चक्रीवादळ, दुसरीकडे थंडीची लाट; महाराष्ट्राला मोठा इशारा; पुढील दोन दिवसांनंतर....
latest weather update
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 8:23 PM

20 ते 22 नोव्हेंबर रोजी अकवान चक्रीवादळाचा मोठा परिणाम ओडिशा आणि आंध्र प्रदेशात दिसणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये राज्यालाही मोठा इशाला देण्यात आला होता. महाराष्ट्रातील विदर्भामध्ये धुवांधार पाऊस हजेरी लावणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. एवढच नाही तर सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस कोसळेल असंही हवामान विभागाने वर्तवलेल्या 19 नोव्हेंबरच्या अंदाजामध्ये सांगण्यात आलं होतं.

अकवानचा विदर्भावर परिणाम नाही

पण, आता हवामान विभागाने ताजा अंदाज वर्तवला असून यामध्ये राज्यात कुठेही अकवानचा प्रभाव दिसून येणार नसल्याचं म्हटलं आहे. अकवान चक्रवाताचा प्रभाव विदर्भावर नाही. चक्रावत कमजोर पडत असून तो विदर्भाच्या समोर गेला आहे. बंगालमध्ये त्याचा मोठा प्रभाव दिसला, मात्र विदर्भावर त्याचा प्रभाव नाही, पाऊस सुद्धा आला नाही. येणाऱ्या दिवसात उत्तरीय हवेचा प्रभाव कमी होऊन थंडी कमी होणार, तापमानात काहीशी वाढ होणार आहे, अशी माहिती नागपूर हवामान विभागाने गिली आहे.

Loading...

थंडीचा जोर वाढणार

पूर्वेकडील हवेचा जोर वाढणार त्यामुळे तापमानात वाढ होईल. 2 ते 3 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात वाढ होणार आहे, त्यामुळे तापमान वाढेल. पुढील दोन दिवसांनंतर आता 24 ते 25 तारखेचेच्या आसपास पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार, असा नागपूर हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. प्रवीण कुमार, शास्त्रज्ञ नागपूर हवामान विभाग यांनी ही माहिती दिली आहे.

काल रात्री उशीरा पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला होता. इथे अकवान हे चक्रीवादळ 130 च्या वेगाने धडकणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं होतं, त्यानंतर सर्वत्र अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. कवान चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टी भागाता धोका अधिक वाढला आहे. त्याचवेळी अनेक राज्यात शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या.

भारतीय हवामान विभागाने 20 नोव्हेंबर पोजी 14 राज्यात पावसाचा अलर्ट दिला आहे. या राज्यात अतिमुसळधार पाऊस होईल. ओडिशामध्ये या चक्रीवादळाचा धोका अधिकप्रमाणात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला होता. तर विदर्भामध्ये धो-धो मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण आता नागपुरातल्या हवामान विभागाने हा अंदाज चुकीचा ठरवला आहे. विदर्भाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us