AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणपाठोपाठ रायगड हादरलं… रायगडमधूनही तीन मुली बेपत्ता, घरातून बाहेर पडल्या त्या…

कल्याणमध्ये चार अल्पवयीन विद्यार्थिनी एकाच वेळी बेपत्ता झाल्याने खळबळ माजली होती. आता रायगड येथून देखील तीन मुली बेपत्ता झाल्या आहे... मुली घरातून बाहेर तर पडल्या घरी परत्याच नाही. यामुळे शहरात खळबळ उडाली असून महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित राहिला आहे.

कल्याणपाठोपाठ रायगड हादरलं... रायगडमधूनही तीन मुली बेपत्ता, घरातून बाहेर पडल्या त्या...
| Updated on: Jul 02, 2026 | 1:22 PM
Share

देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात मुली सुरक्षित नाहीत, हे धक्कादायक चित्र पुन्हा समोर आलं आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि रोहा तालुक्यातून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये अलिबाग आणि रोहा पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून मुलींचा शोध सुरू आहे. मुली अचानक गायब झाल्यामुळे परिसरात खळबळ उडली आहे. मुली बेपत्ता होत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न आता प्रशासना पुढे आहे. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील वरसोली परिसरातील 16 वर्षीय मुलगी 29 जून रोजी पहाटे घरातून बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी शोध घेऊनही ती न सापडल्याने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

तर रोहा तालुक्यात एका महिलेची 16 वर्षीय मुलगी आणि तिची 16 वर्षीय मैत्रीण 29 जून रोजी सकाळी घरातून बेपत्ता झाल्या. दोन्ही मुली एकाच वेळी गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुली कुठे निघालेल्या? शेवटी कोणाला दिसल्या? अशा अनेक बाजूंनी पोलीस चौकशी करत आहेत. पण

या दोन्ही घटनांमध्ये अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलींना पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 137(2) अंतर्गत अपहरणाचे गुन्हे नोंदवले आहेत. या सलग घटनांमुळे रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कल्याण येथे काय घडलं?

कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनी गायब झाल्याची घटना 29 जून घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुली शाळेत जाण्यासाठी निघाल्या पण घरी परतल्याच नाहीत. संध्याकाळी शाळेतून परतण्याची वेळ  उलटून गेल्यानंतर देखील मुली आल्या नाहीत.

मुली घरी आल्या नाहीत म्हणून कुटुंबियांनी सर्वत्र चौकशी केली. पण मुलींबद्दल काहीच कळलं नाही. त्यानंतर मुलींच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठलं. आता मुलींच्या शोधासाठी राज्यातील विविध भागांत पथके कार्यरत आहेत.

Follow Us
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!