बकरी ईदला नमाज पढण्यासाठी 50 जणांना परवानगी द्या; रामदास आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Jul 19, 2021 | 4:33 PM

बकरी ईदच्या (Bakrid 2021) पवित्र उत्सव दिनी मुस्लिम समाजाला मास्क आणि सोशल डिस्टन्सचे नियम पाळून 50 जणांना मशिदीमध्ये नमाज पढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बकरी ईदला नमाज पढण्यासाठी 50 जणांना परवानगी द्या; रामदास आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us on

मुंबई : बकरी ईदच्या (Bakrid 2021) पवित्र उत्सव दिनी मुस्लिम समाजाला मास्क आणि सोशल डिस्टन्सचे नियम पाळून 50 जणांना मशिदीमध्ये नमाज पढण्याची परवानगी द्यावी, या मागणीसह बकरी ईद बाबत विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवीत असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे. मौलाना अब्दूर रशीद अन्सारी, मौलाना अमानुल्लाह खान, कारी ओवेस साहेब, मोहम्मद कलीम शेख, मुस्तफा अन्सारी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने आज राज्यमंत्री आठवलेंची भेट घेतली होती. या शिष्टमंडळाला आठवले यांनी आश्वस्त केले. (Allow 50 people to pray on Bakri Eid; Ramdas Athawale demand to CM Uddhav Thackeray)

बकरी ईद साठी ऑनलाईन खरेदी ऐवजी बाजारात बकरी विक्री सुरू करावी, कुर्बानीसाठी देवनार येथील पशूवधगृहात परवानगी द्यावी, प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाममध्ये मान्य नसून या पद्धतीचा नियम राज्य सरकारने मुस्लिमांवर लादू नये, अशी मागणी मौलाना अब्दूर रशीद अन्सारी यांनी रामदास आठवले यांना निवेदन देऊन केली आहे. मुस्लीम समाजाच्या या मागण्यांसाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांना पत्र पाठवणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी अन्सारी यांना दिले.

ईदची नमाज घरीच, बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जारी

कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. 21 जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.

प्रतिकात्मक कुर्बानी करण्याचं आवाहन

सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.

ब्रेक द चैनचे निर्बंध कायम

लागू करण्यात आलेले ‘ब्रेक दि चैन’ चे निर्बंध तसेच त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये

बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक असेल असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात 

महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात असला तरी कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आलीय असं म्हणता येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूची दुसरी लाट उलटू शकते, असं म्हटलं आहे. तर, राज्यात काही ठिकाणी  डेल्टा प्लस चे रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यात तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनानं  केलं आहे.

इतर बातम्या

जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरलं, भरती नसताना मिठी नदीला पूर आला, मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?; शेलारांची भीती

ठाणे पालिकेचे विरोधी पक्षनेते अ‍ॅक्शन मोडवर, कंबरभर पाण्यातून वाट कढत तोडली संरक्षक भिंत; पूरस्थिती टळली

फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात पेगासस कांड घडले का याची चौकशी करा; सचिन सावंत यांची मागणी

(Allow 50 people to pray on Bakri Eid; Ramdas Athawale demand to CM Uddhav Thackeray)