Breaking : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन! परिसरात मोठी खळबळ

| Updated on: Oct 07, 2021 | 5:23 PM

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक मंदिरात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून मंदिराचा कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे.

Breaking : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन! परिसरात मोठी खळबळ
कोल्हापूर अंबाबाई मंदिर
Follow us on

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. तसंच राज्यातील मंदिरंही आजपासून उघडण्यात आली आहे. अशावेळी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक मंदिरात दाखल झाले. त्यांच्याकडून मंदिराचा कानाकोपऱ्यात शोध घेण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मंदिर परिसर रिकामा करण्यात आला. मात्र, बॉम्बशोधक पथकानं संपूर्ण मंदिर परिसरात पाहणी केल्यानंतर अशी कुठलीही वस्तू किंवा पदार्थ मिळून आला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. (Anonymous phone call about the bomb placed at the Ambabai temple)

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. पणजी (गोवा) कंट्रोल रुमला हा फोन आला होता. या फोनमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली होती. फोनवरुन ही माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर तात्काळ बंद केलं. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बॉम्ब किंवा बॉम्ब सदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यावेळी सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. अखेर हा फोन कॉल बोगस असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यानंतर आता भाविकांसाठी मंदिर पुन्हा एकदा खुलं करण्यात आलं आहे.

अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात

साडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचे पीठ असणाऱ्या अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीने घटस्थापना झाली आहे. मंदिर समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी ही तोफ दिली. या सलामीनंतर करवीर नगरीत नवरात्रोत्सवाला सुरवात होते. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुहूर्ताने अंबाबाई मंदिरात घटस्थापना केली जाते. मंदिरात घटस्थापना झाल्याचा संदेश करवीरवासियांना मिळावा यासाठी तोफेची सलामी देण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून जपली जाते. अंबाबाई मंदिरातील या तोफेच्या सलामीने नंतरच भाविक आपल्या घरांमध्ये घटाची स्थापना करत असतात.

तुषार भोसलेंवर तुळजाभवानी मंदिर संस्थान मेहरबान!

भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यावर तुळजाभवानी मंदिर संस्थान आज मेहेरबान झाल्याचे पाहायला मिळाले. भाविकांना मंदिरात सांयकाळी 6 नंतर प्रवेश असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश काढले होते. मात्र, पास न काढताच भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी सहपरिवार तुळजाभवानीचे दर्शन घेतले.

गुन्हा दाखल होणार

भाजप अध्यात्मिक आघडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. नियम सर्वांना सारखे आहेत. नियमभंग केला असेल तर कारवाई केली जाईल, असे सांगत कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांना कारवाईचे आदेश दिले. भक्तांना सायंकाळी 6 नंतर तुळजाभवानी मंदिरात प्रवेश असताना भोसले यांना मंदिरात नियमबाह्य प्रवेश दिला गेला. भोसले यांनी विना पास प्रवेश करून मंदिर गाभाऱ्यात सहकुटुंब आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसह फोटोसेशनही केलं आहे. यावेळी त्यांनी मास्क घातला नसल्याचं पाहयला मिळतंय.

इतर बातम्या :

भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा धसका का घेतला? जयंत पाटलांचा खोचक सवाल

पवारांच्या पुण्यातील ‘मोदी बागेतच’ छापेमारी सुरू; सकाळपासून आयकर विभागाची झाडाझडती सुरू

Anonymous phone call about the bomb placed at the Ambabai temple