‘आज बाळासाहेब ठाकरे असते तर…’, अमित शाह यांचं नांदेडमध्ये मोठं वक्तव्य

अमित शाह हे आज नांदेड दौऱ्यावर आहेत, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

आज बाळासाहेब ठाकरे असते तर..., अमित शाह यांचं नांदेडमध्ये मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 26, 2025 | 6:08 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत, निवडणुकीनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ऑपरेश सिंदूरनंतर मोदींनी निर्णय घेतला, सर्व पक्षीय खासदारांनी वेगवेगळ्या देशात जाऊन पाकिस्तानचा खरा चेहर उघड करावा, तेव्हा शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुखांनी म्हटलं, कोणाची वरात निघाली आहे, आज बाळासाहेब ठाकरे असते तर, ऑपरेशन सिंदूरनंतर नरेंद्र मोदी यांची गळा भेट घेत घेतली असती, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अमित शाह? 

अमित शाह हे आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत, निवडणुकीनंतर अमित शाह यांचा हा पहिलाच नांदेड दौरा आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी बोलताना अमित शाह यांनी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘नांदेड गुरू गोविंद सिंह यांची भूमी आहे, इथून पाकिस्तानला आवाज गेला पाहिजे,  मोठ्या आवाजात म्हणा भारत माता की जय,  22 तारखेला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी धर्म विचारून निर्दोष भारतीयांना त्यांच्या कुटुंबासमोर मारलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटनामध्ये दहशतवाद्यांना शोधून त्यांना मातीत मिळवू असं म्हटलं होतं, 15 वर्षांपूर्वी काँग्रेसचं सरकार होतं, आता मोदी यांचं सरकार आहे.

त्यांनी पुलवामावर हल्ला केला, आपण एअर स्ट्राईक केला. त्यांनी पहलगामवर हल्ला केला आपण ऑपरेशन सिंदूर केलं. पूर्ण जगाला संदेश दिला आहे, भारताला डिवचू  नका, नाहीतर परिणाम वाईट होतील,  सात मे रोजी अवघ्या बावीस मिनिटांमध्ये दहशतवाद्यांचे 9 ठिकाण उद्ध्वस्त केले. त्यांच्या हेडकॉटरला उडवण्याचे काम भारतीय सैन्याने केलं. आठ तारखेला पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला, पण आपण त्यांचा हल्ला परतून लावला, नऊ मे रोजी आपण पाकिस्तानवर हल्ला केला, या हल्ल्यामध्ये त्यांचे एअर बेस उद्ध्वस्त केले, मोदींनी या  ऑपरेशनला सिंदूर असं नाव दिलं, आमच्या मुलीच्या कपाळावरील कुंकू स्वस्त नाही हे त्यांनी दाखवून दिलं, असं यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.  ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींनी निर्णय घेतला, सर्व पक्षाचे खासदार वेगवेगळ्या देशात जाऊन पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करतील,  शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुखांनी म्हटलं कोणाची वरात निघाली आहे,  आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूर नंतर नरेंद्र मोदी यांची गळा भेट घेत घेतली असती. नरेंद्र मोदी यांनी ठरवलं आहे, 2047 पर्यंत भारत विकसीत होईल,  देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत, या पाच वर्षांत मराठवाड्यातील प्रत्येक गावात पाणी पोहोचेल, असं शाह यांनी यावेळी म्हटलं आहे.