AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको”, अमित शाहांकडून भाजप नेत्यांना कठोर सूचना

अमित शाह यांनी महायुतीतील नेत्यांना चांगलेच खडसावले. तसेच त्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सूचनाही केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील चुका विधानसभेत करणं टाळा, अशी सूचना अमित शाह यांनी केली.

महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको, अमित शाहांकडून भाजप नेत्यांना कठोर सूचना
| Updated on: Sep 09, 2024 | 11:43 AM
Share

Amit Shah Mumbai Visit : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे महायुतीच्या गोटात विविध राजकीय बैठका, चर्चा होताना दिसत आहेत. आता नुकतंच अमित शाह यांची भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे एक बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. या बैठकीला अमित शाहांनी सर्व नेत्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये म्हणून जाहीर वाद करणे टाळा, अशी महत्त्वाची सूचना अमित शाहांनी यावेळी दिली.

अमित शाह यांची महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांसह भाजप नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी महायुतीतील नेत्यांना चांगलेच खडसावले. तसेच त्यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सूचनाही केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील चुका विधानसभेत करणं टाळा, अशी सूचना अमित शाह यांनी केली.

“महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये म्हणून जाहीर वाद करणे टाळा”, असेही अमित शाहांनी यावेळी सांगितले. “महायुतीतील नेत्यांनी संयम ठेवावा. महायुतीने एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल, याची काळजी घ्यावी. लोकसभा निवडणुकीतील चुका विधानसभा निवडणुकीत टाळा. लोकसभेचा फटका विधानसभेत नको. नेत्यांनी संयम ठेवावा, जाहीर वाद करु नका” , अशा महत्त्वाच्या सूचना अमित शाह यांनी दिल्या.

अमित शाह यांच्या दौऱ्याचे नियोजन

दरम्यान आज सोमवारी सकाळी १०.४५ वाजता अमित शाह हे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी जातील. यानंतर ११.१५ च्या सुमारास अमित शाहा हे एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी जातील. त्यानंतर अमित शाह हे दुपारी १२.१० मिनिटांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतील. तसेच १२.५० मिनिटांनी अमित शाह हे आशिष शेलार यांच्या वांद्र्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देतील, असे अमित शाह यांच्या दौऱ्याचे नियोजन आहे.

अमित शाह यांनी काल सह्याद्री अतिथीगृहावर मुक्काम केला होता. अमित शाह यांना भेटण्यासाठी भाजपचे अनेक दिग्गज नेते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रविंद्र चव्हाण असे अनेक दिग्गज नेत्यांनी अमित शाहांची भेट घेतली. आता दुपारनंतर पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार असल्याचे बोललं जात आहे. या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाबद्दल निर्णय होणार असल्याचे बोललं जात आहे.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना