AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी – अमित शाह

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा देशाच्या राजकारणावर प्रभाव पडतो असं अमित शाह म्हणाले आहेत. अमित शाह आज नागपूरमध्ये बोलत होते.

महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी - अमित शाह
| Updated on: Sep 24, 2024 | 10:34 PM
Share

अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले की, ‘मी राजकीय बोलायला आलो नाही. मी फक्त कार्यकर्त्यांशी बोलायला आलोय. काही राज्याच्या निवडणुका काश्मीर पासून कन्याकुमारी आसाम पर्यंत प्रभाव टाकतात. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी आहे. कलम ३७० फाडून फेकला, तीन तलाक काढलं यासह धाडसी निर्णय घेतले. देशात पाकिस्तानी आतंकवाद्यांना थांबवायला कुणी नव्हतं, मोदींनी स्ट्राईक केली आता पाकिस्तानची हिम्मत नाही. आमची अर्थव्यवस्था देशाची पाचवी अर्थव्यवस्था बनवली. मराठवाड्यात 48 पैकी 30 जागा जिंकायच्या आहेत. लक्ष ठेवून त्याच्यासाठी काम करावं लागतं. रणनीती बनवायला लागते तेव्हा विजय होतो.’

‘ही निवडणूक जोशमध्ये नाही होशमध्ये निवडणूक लढवायची आहे. निवडणूक जिंकवायच काम कार्यकर्ता करत आहे. मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि फडणवीस बघतील. आमच्या वेळी 3 आंदोलने सुरू होती तरीही आपण जिंकलो. लिहून घ्या…. एका बूथवर १० टक्के मत वाढवणे. ५० टक्के झालं तर ६९ टक्के करा. नवरात्र पहिल्या दिवशी मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घ्या. प्रत्येक मंडळाच्या एका कार्यकर्ता शक्ती केंद्र द्यायचं आहे. मंडळ अध्यक्ष प्रमुख यांना बूथ अध्यक्षाला १० टक्के मत वाढवायचं आहे. याचा फॉलोअप घ्यायचा आहे.’

‘दसऱ्या पासून दिवाळी पर्यंत सगळ्या बूथ वर एक राऊंड मारायचं आहे. भारत माता की जय म्हणत रॅली काढायची आहे. त्यानंतर ज्या मंदिरात पुजारी असतील त्यांचे पाय पडायचे. श्रीफळ देऊन १०१ रुपया द्यायचा आहे. त्यांचा निवडणुकीसाठी आशीर्वाद घ्यायचा आहे. मविआतील पक्षांची चिंता करायची नाही. मत वाढवण्यासाठी प्रत्येक घरात जायचं. पदाधिकरी कार्यकर्त्यांचे भांडण मिटवा. आजपासून निवडणुका चालू झाल्या आहे अस समजा. माझा एक वेळी तिकीट कटल होतं. मी निराश झालो. मात्र आता देशात कुठेही निवडणुका असेल तिथे मी जातो. हा पक्ष मागणाऱ्याला काही देत नाही मात्र न मागणाऱ्या देत असतो.’

‘प्रत्येक बूथ वरील MVA कार्यकर्त्याला भाजप मध्ये घेऊन या. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन या. विजय तुमचाच होईल. हे सगळं केलं तर माराठवड्यात ३० जागा नक्की येतील. ज्यांना आंदोलन करायचं त्यांना करू द्या. निवडणूक जिंकायची सवय लावा, मी ३ निवडणुका वाघ्याच्या तोंडातून जिंकल्या आहेत.’ असं ही अमित शाह म्हणाले.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.