Amol Mitkari | ‘केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, भाजपा को करारा जवाब मिलेगा’
ज्या पद्धतीने भाजपाचा (BJP) बुरखा नवाब मलिक (Nawab Malik) फाडणार होते, त्याच्यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे. यांनी मराठा, ओबीसी नेते संपवले आणि आता हे मुस्लीम (Muslim) नेत्यांना संपवायला लागले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी अकोल्यात केली.
ज्या पद्धतीने भाजपाचा (BJP) बुरखा नवाब मलिक (Nawab Malik) फाडणार होते, त्याच्यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे. यांनी मराठा नेते संपवले, यांनी ओबीसी नेते संपवले आणि आता हे मुस्लीम (Muslim) नेत्यांना संपवायला लागले आहेत. त्यामुळे आता भाजपा शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत आहे. हे स्पष्ट होत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी अकोल्यात केली. भाजपावाले पळपुटे आहेत. ते आता घाबरले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपा को करारा जवाब मिलेगा, अशी खोचक टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. पवार साहेबांनी काही मिनिटांपूर्वी स्टेटमेंट दिलं की हे होणारच होतं. काल दिशा सालीयन प्रकरणामध्ये जी पत्रकार परिषद नवाब मलिकांनी घेतली होती, त्याच पत्रकार परिषदेतून आज भारतीय जनता पार्टीचे चित्रपटसृष्टीतील कोणत्या सिनेअभिनेत्रींसोबत संबंध आहेत, ते आज जाहीर करणार होते. त्यामुळे भाजपा घाबरली होती. म्हणून त्यांनी सुडाचे राजकारण केले, अशी टीकाही मिटकरी यांनी केली.
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

