AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सख्ख्या नात्याला काळिमा, चिकनच्या एका तुकड्यामुळे भाऊ संतापला अन् जे घडलं ते…

अमरावतीच्या भातकुलीत चिकन खाण्याच्या वादातून २१ वर्षीय मावस भावाने १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर अपघाताचा बनाव रचणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सख्ख्या नात्याला काळिमा, चिकनच्या एका तुकड्यामुळे भाऊ संतापला अन् जे घडलं ते...
Crime amravti
| Updated on: Feb 27, 2026 | 9:31 AM
Share

एका बाजूला सख्ख्या नात्यांमधील ओलावा कमी होत असताना अमरावतीच्या भातकुलीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. केवळ चिकन खाण्यावरून झालेल्या वादामुळे एका चिमुकल्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २१ वर्षीय मावस भावाने आपल्याच १२ वर्षीय लहान भावाचा लोखंडी रॉडने वार करून खून केला. जितेराजा गौड (१२) असे या मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

जितेराजा आणि आरोपी बब्बू गौड (२१) हे मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. रोजगाराच्या शोधात हे कुटुंब भातकुली तालुक्यात आले होते. अमरावतीतील भातकुलीतच ते वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात चिकन बनवण्यात आले होते. जेवताना चिकनच्या खाण्यावरून जितेराजा आणि बब्बू यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. मात्र रागावर नियंत्रण न राहिल्याने बब्बूने घरातील लोखंडी वस्तू काढली. त्यानतंर त्याने त्याच्याच लहान भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत जितेराजा याला जोराचा फटका बसला. त्यामुळे बालकाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आरोपी आणि कुटुंबाने या घटनेला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. मुलाचा मृत्यू अपघाताने किंवा अन्य कारणाने झाला असल्याची खोटी तक्रार मृताच्या वडिलांनी पोलिसांत दिली. मात्र घटनास्थळाची पाहणी आणि मुलाच्या शरीरावरील जखमा पाहून पोलिसांना संशय आला. यानंतर भातकुली पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. यावेळी कुटुंबातील सदस्यांच्या जबाबात तफावत आढळली. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि पोलिसी खाक्या दाखवताच बब्बू गौड याने हत्येची कबुली दिली.

पित्यावरही गुन्हा दाखल

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या वडिलांनी सत्य परिस्थिती माहित असूनही पोलिसांकडे अपघाताची खोटी तक्रार दिली. गुन्ह्याची माहिती लपवणे आणि पोलिसांची दिशाभूल करणे या आरोपाखाली पोलिसांनी मृताच्या वडिलांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. सध्या मुख्य आरोपी बब्बू गौड याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

बुलढाण्यात सख्ख्या भावाची हत्या

तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील राहुड येथे शेतात सख्ख्या भावाची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोशन संजय इंगळे (३६) याने त्याचा धाकटा भाऊ चेतन इंगळे (३५) याला खामगावच्या रवी देवीदास राऊत याच्या मदतीने २५ फेब्रुवारी रोजी ठार केले. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह लाकडांवर जाळून राख आणि अस्थी नदीत फेकून दिल्या होत्या. चेतन बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर पिंपळगाव राजा पोलिसांनी तपास चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली. ते आता हत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. या भयानक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Follow Us
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला.

IND vs ZIM: मॅचच्या 24 तासआधी झिम्बाब्वेने भारतीय संघाला दिलं ओपन चॅलेंज, अचानक मोठा निर्णय घेतला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report