AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Hospital Fire : धक्कादायक, अमरावतीत हॉस्पिटलला आग, तीन लहान बालकांचा होरपळून मृत्यू, VIDEO

Amravati Hospital Fire : आज एक मन सून्न करणारी घटना घडली आहे. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली. या आगीत होरपळून तीन बालकांचा मृत्यू झाला आहे.

Amravati Hospital Fire : धक्कादायक, अमरावतीत हॉस्पिटलला आग, तीन लहान बालकांचा होरपळून मृत्यू, VIDEO
Amravati Hospital Fire
| Updated on: Aug 24, 2026 | 7:38 AM
Share

स्वपनील उमप, प्रतिनिधी : अमरावतीमध्ये आज पहाटे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली. या आगीत तीन लहान बालकांचा होळपळून मृत्यू झाला. पहाटे 3.30 वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात अचानक आग लागली. व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली. जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे 3.30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. 9 लहान बाळांना याठिकाणी ठेवले होते. या नवजात शिशु अतिदक्षता विभागात NICU मध्ये एकूण नऊ बालकांवर उपचार सुरु होते. यात तीन बालकांचा मृत्यू झाला. सहा बालकांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत आई-वडिलांनी आपल्या कोवळ्या बाळांना गमावलं आहे. निशब्द, मन सुन्न करणारी ही घटना आहे. रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सर्वसामान्यांच्या मनात या घटनेबद्दल चीड, संतापाची भावना आहे.

ज्या बालकांचं वजन कमी असतं, ज्या मातांची सातव्या महिन्यात प्रसुती होते, ज्या बालकांना जन्मल्यानंतर वाढीमध्ये काही समस्या असतात किंवा डॉक्टरांना ज्या बालकांना विशेष देखरेखीखाली ठेवायचं असतं, अशा बाळांना नवजात शिशु अतिदक्षता विभागात NICU मध्ये ठेवलं जातं. मध्यरात्री 3.30 च्या सुमारास व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग भडकली. सगळा NICU कक्ष या आगीत जळून खाक झाला आहे. दृश्यांमधून या आगीची तीव्रता किती भयंकर होती, ते दिसून येतय. आगीमुळे बाळांचा गुदमरुन मृत्यू झाला.

ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट ते कालबाह्य झाले होते का?

ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, ते कालबाह्य झाले होते का? त्यात काही तांत्रिक समस्या होत्या का? असे अनेक प्रश्न आहेत. ज्या परिसरात हे हॉस्पिटल आहे, तिथपासून फायरब्रिगेडचं ऑफिस किती लांब आहे? आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब किती वेळात पोहोचले? हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. डीसीपी, अन्य पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. 10 दिवस, 15 दिवसाचे कोवळे जीव या ठिकाणी उपचार घेत होते. खरचं काळीज हेलावून टाकणारी ही घटना आहे. याआधी सुद्धा NICU मध्ये आग लागून अनेक बालकांनी आपले प्राण गमावले आहेत.

नवीन इमारत होती

ज्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागली महत्वाचे म्हणजे ती नवीन इमारत होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं होतं. नव्या इमारतीत अशी दुर्घटना घडणं गंभीर बाब आहे. या दुर्घटनेची चौकशी होणं गरजेचं आहे.

Follow Us
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं...- CM फडणवीस
Sharad Pawar : शरद पवार आजही सक्रिय, निवृत्तीची चर्चा करणं... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून...
कोकणाची तहान आधी भागवा, मगच मुंबईला पाणी द्या! कोयनेच्या पाण्यावरून शेखर निकम आक्रमक
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचं विधान...
शेतकरी आंदोलनात पक्षीय राजकारणाला थारा नाही! रोहित पवारांचा मोठा निर्णय, म्हणाले...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे...
रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर! थेट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपद देण्याची तयारी