ठाकरेंच्या नगरसेवकाचा संताप, थेट महापालिका सहायक आयुक्तालाच मारहाण, नेमकं काय घडलं?
अमरावतीमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकाने महापालिकेच्या सहाय्यक आयुक्ताला मारहाण केली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या..

अमरावतीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमरावती महानगरपालिकेचे क्रमांक तिनचे सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांना मारहाण झाली आहे. ही मारहाण थेट ठाकरे गटाचे नगरसेवक संजय गव्हाळे यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, सदरील मारहाणीची घटना ही सीसीटीव्हीमध्येही स्पष्टपणे कैद झाली आहे.
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार काही कामानिमित्त संजय गव्हाणे त्यांच्या सहकार्यासह सहायक आयुक्त नितीन बोबडे यांना भेटायला गेले होते. मात्र. या दरम्यान दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी संजय गव्हाळे यांनी जातिवाचक शिवी देऊन मारहाण केल्याचा आरोप नितीन बोबडे यांनी केला आहे. तर आम्ही भेटण्यासाठी गेलो असता नितीन बोबडे यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप नगरसेवक संजय गव्हाळे यांनी केला आहे. या संपूर्ण घटनेनंतर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
मंत्री मेघना बोर्डीकर यांचं आशा आणि अंगणवाडी सेविकेसोबत मेळघाटातील चुरणी मध्ये नारी शक्ती संवाद मेळावा
अमरावती : आशा सेविकेनी यावेळी मेघना बोर्डीकर यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या ज्यात मानधन वाढवन्याची मागणी केली आणि मेळघाटात आधी मतामृत्यू आणि बालमृत्यू खूप होत होते मात्र, आम्ही गर्भवती मातेची खूप काळजी घेतो आणि एक किलो वजनाचे बाळ जन्माला येतात पण कोणीही कौतुक करत नाही.. अशी भावना व्यक्त केल्या. दरम्यान, मेळघाटातील विकासासाठी लागेल तो निधी आम्ही देऊ. ज्या ज्या मेळघाट साठी तुम्ही मागण्या केल्या त्या पूर्ण करण्याचा वचन देतो, अस बोर्डीकर म्हणाल्या.