माझा स्वभाव खराब आहे, मला कुणी समजून घेत नाही; चिठ्ठी लिहून अमरावतीत मुलीची गळफस घेऊन आत्महत्या

मयत मुलगी इयत्ता नववीत शिकत होती. नेहमीप्रमाणे आज वडिल शेतात कामाला गेले, आई कामानिनित्त बाहेर गेली होती. लहान बहिणही घरातून बाहेर गेली होती. यावेळी मुलीने घरी कुणी नसताना ओढणीने गळफास लावत आत्महत्या केली. बहिण घरी परतल्यानंतर तिने मोठ्या बहिणीला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले पाहिले.

माझा स्वभाव खराब आहे, मला कुणी समजून घेत नाही; चिठ्ठी लिहून अमरावतीत मुलीची गळफस घेऊन आत्महत्या
चिठ्ठी लिहून अमरावतीत मुलीची गळफस घेऊन आत्महत्या
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 12, 2022 | 9:54 PM

अमरावती : माझा स्वभाव वाईट आहे, मला कुणीच समजून घेत नाही, अशा आशयाची चिठ्ठी (Suicide Note) लिहून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरमध्ये एका 14 वर्षीय मुलीने राहत्या घरी ओढणीने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नांदगाव खंडेश्वर शहरातील ओंकारखेडा परिसरात ही मुलगी राहते. पोलिस सूत्रांनुसार मुलीचे बाबा हे शेतात गेले होते तर लहान बहीण देखील घराबाहेर गेली होती. तर आई कामानिमित्त बाहेर गेली होती. याच वेळेस मुलीने आत्महत्या केली. दरम्यान आई घरात आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. मृत मुलगी ही नवव्या वर्गात शिकत होती. याप्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पोलिस तपासानंतरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल

मयत मुलगी इयत्ता नववीत शिकत होती. नेहमीप्रमाणे आज वडिल शेतात कामाला गेले, आई कामानिनित्त बाहेर गेली होती. लहान बहिणही घरातून बाहेर गेली होती. यावेळी मुलीने घरी कुणी नसताना ओढणीने गळफास लावत आत्महत्या केली. बहिण घरी परतल्यानंतर तिने मोठ्या बहिणीला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले पाहिले. तिने तात्काळ आई-वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर आई-वडिल घरी आले. नांदगाव पोलिसांना याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी यवतमाळ येथील वसंतराव नाईक रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांना घटनास्थळी मयत मुलीने लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये माझा स्वभाव खराब आहे, मला कुणी समजून घेत नाही, असे लिहिले होते. मात्र अद्याप मुलीसोबत नेमके काय घडले हे अस्पष्ट आहे. याप्रकरणी नांदगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत.