Amravati building collapsed : पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली अमरावतीतली इमारत; व्यापारी अन् कुटुंब आधीच बाहेर पडल्यानं टळला अनर्थ

| Updated on: Jul 14, 2022 | 3:17 PM

ही इमारत मागील काही दिवसांपासून धोकादायक बनली होती. काही वेळापूर्वीच या इमारतीचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर येथील सतर्क व्यापाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. ही इमारत कोसळण्यापूर्वी येथील व्यापारी इमारतीबाहेर आले.

Amravati building collapsed : पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली अमरावतीतली इमारत; व्यापारी अन् कुटुंब आधीच बाहेर पडल्यानं टळला अनर्थ
पत्त्याप्रमाणं कोसळली अमरावतीतली इमारत
Image Credit source: tv9
Follow us on

अमरावती : मुसळधार पावसामुळे (Heavy rain) एक दुमजली इमारत कोसळली आहे. अमरावतीच्या गांधी चौकात ही दुर्घटना घडली आहे. दूध डेअरी आणि इलेक्ट्रिकचे दुकान यामध्ये जमीनदोस्त झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही इमारत कोसळतानाचे दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाले आहे. अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत कोसळली (Building collapsed) आहे. साधारणपणे 35 ते 40 वर्षांपूर्वीची ही इमारत आहे. केवळ दहा मिनिटांपूर्वी या इमारतीतील व्यावसायिक इमारतीबाहेर आले होते. त्यांना याबाबतचा अंदाज आला होता. कारण इमारतीचा काही भाग आधीच कोसळला होता. सतत पाऊसदेखील सुरू आहे. ही इमारत रस्त्यावरच कोसळणार होती. ज्या रस्त्यावर रहदारी होती, तो रस्ता सतर्क नागरिकांकडून आधीच बंद (Road colsed) करण्यात आला होता.

धोकादायक बनली होती इमारत

ही इमारत मागील काही दिवसांपासून धोकादायक बनली होती. काही वेळापूर्वीच या इमारतीचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर येथील सतर्क व्यापाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. ही इमारत कोसळण्यापूर्वी येथील व्यापारी इमारतीबाहेर आले. त्यासोबतच ही इमारत रस्त्यावर कोसळण्याती शक्यता लक्षात घेता रस्ता बंद करण्यात आला होता. येथील वाहनेही काढण्यात आली होती. या इमारतीत दूध डेअरी, इलेक्ट्रिकचे दुकान यासह वरच्या मजल्यावर एक कुटुंब राहत होते. मात्र इमारतीतून काहीसे हादरे बसण्यास सुरुवात झाली. पुढील धोका लक्षात घेता हे सर्वच जण बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे.

हे सुद्धा वाचा

अशी कोसळली इमारत

हादरे बसण्यास झाली होती सुरुवात

इमारत कोसळल्यानंतर याठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी तसेच पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने इमारतीचा मलबा काढण्याचे काम सुरू झाले. दरम्यान, या संपूर्ण इमारतीचा मलबा रस्त्यावर आला असल्याने रस्ता सध्या बंद आहे. त्यामुळे हा मलबा काढण्याचे काम वेगात करण्यात येत आहे. शहरात यानिमित्ताने जुन्या इमारतीत राहणाऱ्यांनी आधीच खबरदारी घेऊन इमारती रिकाम्या कराव्या, यामुळे जीवितहानी टाळता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.