अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक, भाजपाचे उमेदवार रणजित पाटील; बच्चू कडू काय भूमिका घेणार?

प्रहार पक्षाकडून राज्यात पाच ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. आमच्या प्रस्तावाची फडणवीस - शिंदे यांनी दखल घेतली नाही. असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक, भाजपाचे उमेदवार रणजित पाटील; बच्चू कडू काय भूमिका घेणार?
रणजित पाटील
| Edited By: | Updated on: Jan 07, 2023 | 7:53 PM

अमरावती : अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार माजीमंत्री डॉ. रणजित पाटील हे आपला उमेदवारी अर्ज अकरा तारखेला भरणार आहेत. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार आहे. 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता अमरावती येथील पी आर पोटे महाविद्यालय संकुलातील सभागृहात अमरावती विभागातील पदवीधरांचा मेळावा आयोजिण्यात आला आहे.

बच्चू कडू हे भाजप -शिंदे युतीमध्ये आहेत. प्रहार पक्षाकडून राज्यात पाच ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. आमच्या प्रस्तावाची फडणवीस – शिंदे यांनी दखल घेतली नाही. असा आरोप बच्चू कडू यांनी केला. त्यानंतर रणजित पाटील म्हणाले, प्रहार त्यांचा पक्ष आहे. तो निर्णय ते घेतील. पण मित्र पक्ष म्हणून आम्ही सुद्धा त्यांना विनंती करू.

रणजित पाटील म्हणाले, प्रत्येक निवडणुकीला नव्यानं नोंदणी करावी लागते. सहा महिने द्यावं लागतात. नोंदणी लोकांमध्ये जाऊन केली आहे. मंत्री आणि आमदार असताना केलेलं काम आणि पक्षानं केलेलं काम या सगळ्या कामाचा लेखा घेऊन मतदारांकडं पोहचणार आहोत. बूथ लावल्यावर लोकं स्वतःहून कागदपत्र आणून देतात.

प्रत्येक पक्षाचा उमेदवार आमच्या विरोधात उभा राहील. हे लक्षात घेऊनचं आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय. माझ्या दोन्ही निवडणुकीमध्ये सगळ्या राष्ट्रीय पक्षांनी उमेदवार दिला होता.

२० ते २५ उमेदवार निवडणुकीला उभे राहतात. प्रत्येक निवडणुकीला आपआपला स्वभाव असतो. निवडणुकीवर प्रभाव असतो. संबंधित नेतृत्व काम करत असते. त्यांच्याकडं बघून लोकं मतदान करत असतात, असंही रणजित पाटील यांनी सांगितलं.